Vijay Sardesai : विजय सरदेसाई यांनी आरोग्यमंत्र्यांसमोर मांडली इस्पितळाची दुरवस्था

Vijay Sardesai : कोविड काळात सुरू केलेल्या विभागातील यंत्रणा धूळखात पडलेल्या आहेत, ही माहिती फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी आरोग्यमंत्री विश्र्वजीत राणे यांच्या उपस्थितीत उघड केली.
Vijay Sardesai
Vijay Sardesai Dainik Gomantak

Vijay Sardesai : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ हा केवळ पांढरा हत्ती असून काही सुविधा उपलब्ध असूनही त्या कार्यरत नाहीत. जे लोक उपचारासाठी या इस्पितळात येतात त्यांना बांबोळी इस्पितळात पाठविले जाते. आयसीयू विभाग कार्यरत नाही. कोविड काळात सुरू केलेल्या विभागातील यंत्रणा धूळखात पडलेल्या आहेत, ही माहिती फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी आरोग्यमंत्री विश्र्वजीत राणे यांच्या उपस्थितीत उघड केली.

Vijay Sardesai
Sand Extraction: रेती उपसा परवान्यांसाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा

गोवा हे प्रगतीशील राज्य असल्याचे सरकारतर्फे वारंवार सांगितले जाते. मात्र, आरोग्य क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. इतर राज्यांसाठी गोवा आदर्श मानले जाते. त्याचसाठी गोव्यातील समान हक्क कायद्याचा ते अवलंब करू पाहात आहेत. त्यामुळे गोव्यातील इस्पितळांमध्ये आरोग्य क्षेत्राला पूरक अशा सर्व सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

सध्या सरकारने खर्च कपात जाहीर केली आहे. मोठ-मोठे कार्यक्रम करण्यास सरकारकडे आर्थिक बळ आहे. मात्र, आरोग्याचा प्रश्र्न आला की सरकारची तिजोरी खाली झालेली असते. राज्य सरकार नागरिकांना औषधांचे मोफत वाटप करते; पण इस्पितळ असून सुविधाच नाहीत. मग या औषधांचा फायदा काय, असा प्रश्र्न उपस्थित होत असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

Vijay Sardesai
Sand Extraction: रेती उपसा परवान्यांसाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा

आरोग्य हा एक विषय असा आहे तो सर्वांना एकत्रित आणतो. २०२४च्या लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. तेव्हा सरकारने निवडणुकांपूर्वी इस्पितळातील सर्व त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी सरदेसाईंनी आरोग्यमंत्र्यांकडे केली.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील त्रुटीबद्दल आपण न्यायालयात आर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी सुरू होणार आहे. सुनावणीच्या वेळी सरकारने हे इस्पितळ कार्यरत, प्रभावी, कार्यक्षम व कार्यशील करणार, असे न्यायालयाला सांगावे.

- विजय सरदेसाई, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com