Vasco News : काँग्रेसपुढील ५० वर्षे केंद्रात सत्तेत येणे कठीण : मुख्यमंत्री

Vasco News : युवा मतदारांनी आपले बहुमूल्य मत विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
pramod sawant
pramod sawant Dainik Gomantak

Vasco News :

वास्को, देशात काँग्रेस पक्षाचे सरकार पुढील ५० वर्षे तरी येणे कठीण आहे. तसेच त्यांचा नेता ( राहुल गांधी यांचे नाव न घेता) भविष्यात पंतप्रधान कधीच बनणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

युवा मतदारांनी आपले बहुमूल्य मत विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

बायणा येथील प्रचार सभेत ते बोलत होते. मुरगाव मतदार संघातील बायणा, देस्तेरो, जेटी, सडा परिसरात सावंत यांनी प्रचार दौरा केला.

यावेळी बायणा शाफी मज्जिद बाजूस झालेल्या जाहीर सभेला मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धेंपे, मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, मुरगाव भाजप प्रभारी संतोष केरकर, समीर खान, अखिल भारतीय बंजारा समाजाचे सचिव पंडित राठोड, नगरसेविका श्रध्दा आमोणकर, सॅबी डिसोझा व इतर मान्यवर उपस्थित होते.

सावंत पुढे म्हणाले की, देशाचा विकास चौफेर होत असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्य भाजप सरकारने कधीच समाजाचे राजकारण न करता प्रत्येकाला समान अधिकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

उमेदवार पल्लवी धेंपे यांनी सांगितले की, प्रत्येकानी विकसित भारताचे पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपला मतदान करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी अखिल भारतीय बंजारा समाजाचे सचिव पंडित राठोड व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी संपूर्ण देशातील बंजारा समाजाचा लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना यांना पाठिंबा असल्याचे पत्र यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले.

बायणा किनाऱ्यावरील घरांना संरक्षण देणार

भाजप सरकार कदापी बायणा समुद्र किनाऱ्यावर असलेल्या घरांना धोका निर्माण करणार नसल्याची ग्वाही आमदार संकल्प आमोणकर यांनी दिली. मुरगाव बायणा भागातील प्रभाग ७, ८, ९ मधून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देणार असल्याची माहिती आमोणकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com