Valpoi News : भाजपला मोठे मताधिक्य मिळणार : मंत्री विश्वजीत राणे

Valpoi News : वाळपई व पर्ये मतदार संघातून भाजपला मोठी आघाडी मिळणार, असा दावा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला.
Valpoi
ValpoiDainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, केंद्रातील भाजप सरकारमुळे गोव्याचा गेल्या दहा वर्षात कायापालट झालेला आहे. पंतप्रधान मोदींच्या विचारातून ग्रामीण भागात विकासाची गंगा पोचली आहे. गोव्यातही सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे.

सत्तरी तालुक्यात देखील केंद्रामुळे बराच लाभ झालेला आहे. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित झालेला आहे. उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांना पुन्हा एकदा केंद्रात पाठविण्याची संधी मिळाली आहे. वाळपई व पर्ये मतदार संघातून भाजपला मोठी आघाडी मिळणार, असा दावा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला.

Valpoi
Goa Politics: 'गोव्यावर संविधान लादलं असं म्हटलंच नाही', विरियातो म्हणतात खोटं बोलणं मोदींचा स्वभाव

गुळेली पंचायत क्षेत्रातील गुळेली, कणकिरे तसेच धामशे, पैकुळ येथे आयोजित प्रचार सभेत राणे बोलत होते. यावेळी गुळेली सरपंच नीतेश गावडे, भाजपचे पदाधिकारी विनोद शिंदे, पंच अक्षता गावडे तसेच धामशे येथे पंच ज्योती गावकर, पैकुळ येथे संतोषी नाईक, सिद्धू गावकर आदींची उपस्थिती होती.

राणे पुढे म्हणाले की, वाळपई मतदारसंघात चकचकीत हॉटमिक्स रस्ते, सुरळीत पाणी पुरवठा, विविध ठिकाणी पाणी प्रकल्प, विजेची समस्या सोडविण्यासाठी नवीन वीज केबल घालणे अशी कामे झालेली आहेत.

काही ठिकाणी सुरूही आहेत. युवकांना रोजगार देऊन त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडविला आहे. महिलांचे सशक्तीकरण विविध योजना, उपक्रम यांच्या माध्यमातून पूर्णत्वास केले आहे. विकासाची कामे अशीच सुरु ठेवण्यासाठी मोदींजींचे हात बळकट करण्याची फार गरज आहे.

सरपंच नीतेश गावडे यांनी यावेळी विचार मांडले पंच अक्षता गावडे यांनी स्वागत केले. सूत्रनिवेदन विश्वराज सावंत यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com