Vaccination: आजपासून गोव्यात 15 वर्षांखालील मुलांच्या पालकांचे लसीकरण

Vaccination 1.jpg
Vaccination 1.jpg

पणजी: राज्यातील पंधरा वर्षाखालील मुलांच्या पालकांना उद्या तारीख ७ जूनपासून कोरोना प्रतिबंधक लस (Covid-19 Vaccination) देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आज उशिरा ही घोषणा केली. सुरवातीला पाच वर्षाच्या मुलांच्या पालकांना लस देण्याची घोषणा केल्यानंतर दोन दिवसापूर्वीच दहा वर्षा खालील मुलांच्या पालकांना लस देण्याची घोषणा गोवा सरकारने (Government of Goa) केली होती. मात्र लसीकरणाला म्हणावा, तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे व लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी होत नसल्यामुळे पंधरा वर्षाखालील ज्यांची मुले आहेत, अशा पालकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे ठरले असून उद्यापासून ही लस देण्यात येणार आहे. तरी ज्यांची मुले पंधरा वर्षाखालील आहेत. त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. (Vaccination of parents of children below 15 years of age starts in Goa from today)

सध्या राज्यात 45 वर्षावरील सर्व नागरिकांना त्याचबरोबर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू असून दोन दिवसापूर्वीपासून दिव्यांग व्यक्ती व त्याचबरोबर दहा वर्षाखालील मुलांच्या पालकांना  लसीकरण सुरू आहे. उद्या तारीख 7 पासून रिक्षाचालक, टॅक्सीचालक, मोटर सायकल  पायलट आणि खलाशी यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंधरा वर्षाखालील ज्यांची मुले आहेत, त्यांच्या पालकांनाही लस देण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असून कोरोनाबाधित बरे होण्याची संख्या (Recovery Rate) नव्या बाधितांपेक्षा दुप्पटीने वाढत आहे. त्यामुळे गोवा सरकार बरोबरच गोमंतकीय नागरिकांनाही दिलासा मिळत आहे. राज्यात कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी 93.78 टक्के झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com