Varca Accident Death
Varca Accident DeathDainik Gomantak

Goa Accident Death: दोन अपघातांमध्ये दोघींचा करुण अंत

Goa Accident Death: पणजी आणि पर्वरी येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या दोन अपघातांत दोन महिलांचा अवजड वाहनांच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Goa Accident Death: पणजी आणि पर्वरी येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या दोन अपघातांत दोन महिलांचा अवजड वाहनांच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला पाठीमागून ट्रकची धडक बसल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या मेरी फेन्नी डिसोझा (६८) या ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती जेरॉम डिसोझा हे गंभीर जखमी झाले. हे जोडपे नुकतेच ऑस्ट्रेलियामधून फिरून गोव्यात परतले होते. ते गोवा वेल्हा येथील रहिवासी होते.

ही दुर्घटना शुक्रवारी (ता.९) सकाळी १०.१५ च्या सुमारास घडली. जेरॉम डिसोझा हे पत्नी मेरीसह जीए- ०७-एडी-१०८३ क्रमांकाच्या दुचाकीवरून पणजीहून म्हापशाकडे जात होते. याचवेळी जीए-०५-टी-२१४५ क्रमांकाचा ट्रक त्याच दिशेने जात होता.

Varca Accident Death
Goa Budget 2024: शिक्षण, सामाजकल्याण आणि कृषी खात्यासाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा? जाणून घ्या तरतूदी

या ट्रकची दुचाकीला डाव्या बाजूने धडक बसली. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीवर मागे बसलेल्या मेरी या ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडल्या. या अपघातात जेरॉम हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

दुसऱ्या घटनेत पणजी येथील बसस्थानकावरील हनुमान मंदिराजवळ सांताना टेस्ला दी आल्मेदा (वय ६८) ही मूळ नेवरा येथील महिला जीए-०३-के-०५६१ या क्रमांकाच्या बसच्या चाकाखाली आली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल बसचालक प्रशांत विनायक सावंत (वय ३६, रा. हळदोणा) याला अटक केली.

Varca Accident Death
Goa Politics: प्रकाश वेळीप यांना समन्स

ट्रकचालकास अटक : अपघातानंतर ट्रकचालक महेंद्र मोटे (वय २८, रा. पिसुर्ले) हा घटनास्थळावरून निघून थेट पर्वरी पोलिस स्थानकात हजर झाला. याप्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवून सदोष मनुष्यवध केल्याच्या आरोपाखाली मोटे याच्याविरुद्ध भादंसं कलम २७९, ३३७, ३०४(अ) अन्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.

काकोडा येथे दुचाकीस्वार गंभीर :

काकोडा औद्योगिक वसाहतीजवळ स्वयंअपघातात शुक्रवारी रात्री एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. औद्योगिक वसाहतीजवळ एके ठिकाणी रस्त्यावरील स्पीड ब्रेकरजवळ दिवे नसल्यामुळे आणि रंगरंगोटी केली नसल्यामुळे स्पीड ब्रेकरवरून दुचाकी उलटून रस्त्यावर पडल्याने हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तो कुडचडेहून सांगेच्या दिशेने जात होता. त्याला कुडचडे आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com