Sancoale Church Row: सांकवाळ चर्चच्या आवारात देवीची मूर्ती ठेवणाऱ्यांना दोघांना अटकपूर्व जामिन मंजूर

करणी सेनेचे कार्यकर्ते
Sancoale Church Row
Sancoale Church RowDainik Gomantak

Sancoale Church: सांकवाळ येथील अवर लेडी ऑफ हेल्थ चर्चच्या आवारात विजयादुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेले करणी सेनेचे कार्यकर्ते संतोष सिंग राजपूत आणि कालिदास वायगणकर या दोघांना दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

ही चर्चची जागा मूळ हिंदू मंदिराचे स्थान असा दावा करणाऱ्या या संघटनेच्या या दोन कार्यकर्त्यांनी 18 ऑगस्ट रोजी पहाटे तीनच्या सुमारास या चर्चच्या आवारात आत शिरून हा मूर्ती स्थापनेचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांच्या विरोधात वेर्णा पोलीस स्थानकावर गुन्हा नोंद केला होता.

या प्रकरणी संशयितांना अटक केल्यास 50 हजार आणि त्याच रकमेच्या हमिवर मुक्त करावे असे न्या. आगा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com