Sunburn Goa: पाय अडखळले, उभं राहता येईना... सनबर्नमधून दोन मुली थेट रुग्णालयात

पहिल्या दिवसाची सांगता झाल्यानंतर दोन मुलींना महोत्सव स्थळावरुन थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Sunburn Goa 2023
Sunburn Goa 2023Dainik Gomantak

Sunburn Goa 2023: तरुणाईत प्रसिद्ध असलेल्या सनबर्न महोत्सवाला गोव्यात शुक्रवारपासून सुरुवात झाली. 31 तारखेसाठी स्थानिकांनी विरोध केल्यानंतर एक दिवस आगाऊ आयोजन करण्यात आलेल्या सनबर्न पहिल्याच दिवशी विविध कारणांसाठी चर्चेत राहिला.

पहिल्या दिवसाची सांगता झाल्यानंतर दोन मुलींना महोत्सव स्थळावरुन थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सनबर्न महोत्सवाची पहिल्या दिवसाची सांगता झाल्यानंतर दोन मुली अस्वस्थ अवस्थेत आढळून आल्या, याबाबतचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यात दोन्ही मुलींना उभं देखील राहता येत नसून, त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलींना नेमकं कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

ध्वनीमर्यादा ओलांडल्याने पहिल्या दिवशी सनबर्नचे एक स्टेज पोलिसांनी केले बंद

सनबर्नमध्ये पहिल्या दिवशी ध्वनीमर्यादा ओलांडल्याने एक स्टेज पोलिसांनी बंद केले. पहिल्याच दिवशी आवाजाची ठरवून दिलेली मर्यादा ओलांडल्याने गोवा पोलिसांनी महोत्सवातील एक स्टेज रात्री 9 वाजताच बंद केले.

पोलीस उपाधिक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com