Traffic Awareness Drive : पेडणे, डिचोलीत ''वाहतूक नियम जनजागृती'' ; रस्ता सुरक्षा सप्ताहा’ला प्रारंभ

राज्य पातळीवरील ‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’ला शुक्रवारी (ता.६) सुरवात झाली.
Traffic Awareness Drive
Traffic Awareness DriveDainik Gomantak

Traffic Awareness Drive : मोरजी डिचोली, ता. ६ (प्रतिनिधी) : प्रत्येक वाहनचालकाने कुठल्याही प्रकारचे वाहन रस्त्यावर चालवताना वाहतुकीचे जे नियम आहेत, ते पाळावेत.

हे नियम व्यवस्थित पाळले गेले, तर अपघात टाळू शकतात, असे पेडणे पोलिस ट्राफिक निरीक्षक विश्वजीत चोडणकर यांनी सांगितले. ‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’निमित्ताने पेडणे कदंब बसस्थानकावर विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, राज्य पातळीवरील ‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’ला शुक्रवारी (ता.६) सुरवात झाली. या सप्ताहाचे औचित्य साधून डिचोली ट्राफिक विभागाच्या पोलिसांतर्फे वाहतूक नियमांविषयी जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या बुधवार, १२ रोजीपर्यंत हा सप्ताह पाळण्यात येणार आहे.

ट्राफिक पोलिस विभागाचे निरीक्षक गौरीश मळीक यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी डिचोलीत जागृती केली.

येथील बसस्थानक परिसरात उभे राहून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांना वाहतूक नियमांविषयी माहिती दिली. ‘डोन्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ असा संदेश देणारी पत्रके वाटण्यात आली.

Traffic Awareness Drive
Goa Congress : भाजपची असंसदीय भाषा ; काँग्रेस कार्यकर्ते संतापले

वाहतूक कार्यालयातर्फे स्पर्धा

‘रस्ता सुरक्षा सप्ताह’निमित्त वाहतूक (आरटीओ) कार्यालयातर्फे जागृती करण्यात येत आहे. विविध प्रकारचे उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

डिचोली आणि सत्तरी तालुका मर्यादित पथनाट्य आणि रील मेकिंग स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. ‘स्टॉप ऍक्सिडेंट, बिफोर दे स्टॉप यू’ ही यंदाच्या सप्ताहाची संकल्पना आहे.

प्रत्येक दुचाकीस्वराने वाहन चालवताना हेल्मेट परिधान करावे. नियम पाळले तर अपघातांवर शंभर टक्के नियंत्रण मिळू शकते.

तशा प्रकारचे प्रयत्न करावेत. वाहनचालकांनी सिग्नल तोडू नये, नो-पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करू नयेत. अशा ठिकाणी वाहने पार्क केली तर दंडात्मक कारवाई करण्यास पोलिस तप्तर आहेत.

- विश्वजीत चोडणकर,

ट्राफिक पोलिस निरीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com