Kadamba Bus
Kadamba BusFile Photo

Kadamba Bus: उसकई-पोंबुर्फात बसेसच्या कमतरतेमुळे वाहतुकीची समस्या; प्रवाशांची गैरसोय

म्हापसा-पणजी मार्गे उसकई, ओळावली, पोंबुर्फा, एकोशीमार्गे फक्त तीन बसेस धावत असल्याने दररोज प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

म्हापसा-पणजी मार्गे उसकई, ओळावली, पोंबुर्फा, एकोशीमार्गे फक्त तीन बसेस धावत असल्याने दररोज प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, दोन बसेसमधील लांब अंतराचा सुद्धा प्रवाशांना फटका बसतोय. सातत्याने मागणी करुनही अरुंद रस्ते, कोंडी व लांब पल्ला यामुळे एकही जादा बस मार्गावर धावत नाही.

Kadamba Bus
Goa Crime News: कुडचडेत अज्ञाताने 8 वाहनांवर दगडफेक करून फोडल्या काचा; केपे पोलिसात गुन्हा दाखल

या कालावधीत मार्गावर धावणार्‍या प्रवासी बसची संख्या १५ बसेसवरुन आता तीन बसेसवर आली आहे. परिणामी प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक व सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना दीर्घकाळ वाट पाहण्यासारख्या समस्यांसह दैनंदिन त्रास सहन करावा लागतो. तसेच रविवारच्या दिवशी बसेस नसल्यामुळे नागरिकांची मोठी पंचाईत होते.

उपलब्ध माहितीनुसार, बसचालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसेसची संख्या या मार्गावर कमी झाली आहे. स्थानिकांनी असा दावा केला की, मुख्य कारण अरुंद रस्ता आहे. ज्यामुळे अनेकदा मार्गावर ब्लॉक निर्माण होतो . याशिवाय मार्ग लांब असल्याने एका बाजूने प्रवासाला सुमारे तासभर लागतो. खासगी वाहनांच्या वाढीमुळे देखील मार्गावरील प्रवासी कमी झाले आहेत. कारण, लोक स्वतःची वाहने वापरण्यास प्राधान्य देतात, ही देखील आणखी एक समस्या आहे.

उसकई, ओळावली, पोंबुर्फा, एकोशी या मार्गावरील सार्वजनिक वाहतुकीवर नाराजी व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिक रोझी साल्ढाना म्हणाल्या की, आमच्याकडे याा मार्गावर फक्त तीन बस आहेत. परिणामी म्हापसा येथे येताना आमचा वेळ वाया जातो. कारण लोकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते आणि नंतर इतर पर्यायांचा वापर करणे भाग पडते.

ओळावली येथील आणखी एक प्रवाशी मारिया मार्टिन्स म्हणाल्या की, फक्त तीन बस असल्याने एक बस सुटली तर पर्याय नाही. आणि मुख्य समस्या म्हणजे बसचालकांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे एक बस नसल्यास त्यांनी दुसर्‍या बससाठी कळवणे गरजेचे. जेणेकरुन आवश्यक व्यवस्था करता येईल.

आरटीओच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्हाला स्थानिक रहिवाशांकडून येणार्‍या अडचणींबद्दल तक्रार येत आहेत. याबाबत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी या मार्गावर आणखी बस सुरू करण्यासाठी केटीसीएएला पत्रही लिहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com