Margao : उद्या मडगावात शिगमो मिरवणुकीसह ‘आयएसएल’ लढतीसाठी होणार गर्दी

डबल धूम : अनेक रस्ते वाहतुकीस बंद; रहदारीवर ताण शक्य
Shigmotsav in Pernem Goa 2023
Shigmotsav in Pernem Goa 2023Dainik Gomantak

मडगाव येथे शनिवारी (ता. 18) शिगमोत्सव मिरवणुकीसह आयएसएल फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना फातोर्डा स्टेडियमवर होणार असल्याने शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे.

हे दोन्ही कार्यक्रम जवळपास एकाच ठिकाणी असल्याने शहरातील कित्येक रस्ते वाहतुकीला बंद करण्यात येणार असल्याने बसमधून प्रवास करणाऱ्या लोकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. यावेळी शिगमोत्सव मिरवणूक होली स्पिरीट चर्च ते मडगाव पालिका या मार्गाने होणार असल्याने शहरातून जाणारा हॉस्पिसियो रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

Shigmotsav in Pernem Goa 2023
संघर्षाला दोन्ही घटक जबाबदार; देशी पर्यटकांच्या गैरवर्तन घटनांत वाढ

आबाद फारिया रस्त्यावरून नियमित वाहतूक होणार असली तरी गर्दी टाळण्यासाठी मोठ्या बसेस नुवे बायपास रोडवरून वळविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्यास सांगे आणि सावर्डे भागात जाणाऱ्या प्रवाशांना ते त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फातोर्डा येथे सामन्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनाही काही ठिकाणी निर्बंध घालण्यात आलेले असून फातोर्डा स्टेडियमपासून अंबाजीपर्यंत जाणारा रस्ता नियमित वाहतुकीला बंद ठेवण्यात आला असून हा रस्ता सामना पाहण्यासाठी येणारे व्हीआयपी, स्थानिक रहिवाशी आणि रुग्णवाहिकांसाठीच खुला ठेवण्यात येणार आहे.

Shigmotsav in Pernem Goa 2023
प्रादेशिक आराखडा दुरुस्ती प्रक्रिया, झोन शुल्कात बदल

फातोर्डा-चार रस्ता जंक्शन व्हीआयपी वाहनांसाठी

फातोर्डा चार रस्ता जंक्शन फक्त ‘व्हीआयपी’ वाहनांसाठी खुला असेल तर बोर्डाकडून मडगाव शहरात येणारा रस्ता रहदारीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कदंब बस स्थानक ते फातोर्डा हा रस्ताही वाहतुकीला बंद ठेवण्यात आला.

दक्षिण गोव्यातून आलेली वाहने खारेबांद मार्गे नुवे बगलमार्ग रस्त्यावरून तर फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या बसेस बोर्डा, पश्‍चिम बगलमार्ग आणि नुवे बगलमार्गावरून वळविण्यात येणार आहेत, असे वाहतूक पोलिस विभागाने कळविले आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com