Goa Daily News Wrap: गोव्यातील अपघात, राजकारण, गुन्हे विश्वातील ठळक घडमोडी वाचा एका क्लिकवर

Goa Latest News and Update in Marathi (17 February 2024): पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या. ब्रेकिंग न्यूज...
Goa Live News
Goa Live NewsDainik Gomantak

दुर्दैवी! हरमल अपघातातील दोन्ही भावांचा मृत्यू

स्विफ्ट कारचा दरवाजा मध्येच उघडल्याने दुचाकीवरील दोन भावांची दरवाज्याला धडक. धडक बसून रस्त्यावर कोसळलेल्या भावांच्या अंगावरुन गेला ट्रक. या ट्रॅजीक अपघातात दीप आणि साहिल या दोन्ही भावांचा मृत्यू. घटनास्थळावरून पळ काढलेल्या स्विफ्ट कारमधील इसमांना पणजीत पकडले. हरमल गावावर शोककळा. शिवजयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द.

हरमल अपघात! दुचाकीवरील चुलत भाऊ जखमी, एकाचा मृत्यू

Arambol Hit And Run Case

हरमल महापुरुष मंदिराजवळ दुचाकी आणि चारचाकी यांच्यात भीषण अपघात. दुचाकीवर असणारे चुलत भाऊ गंभीर जखमी. उपचारादरम्यान साहिल नाईक याचा मृत्यू, तर दीप नाईकची प्रकृती चिंताजनक. अपघातानंतर कार चालक फरार.

Arambol Hit And Run Case
Arambol Hit And Run Case

आता एफडीए एक्टीव्ह मोडवर! बांबोळी एसएसबीसमोरील स्टॉल्सची तपासणी

GMC FDA

एसएसबीचे नोडल अधिकारी डॉ.उदय काकोडकरांच्या वादग्रस्त नोटनंतर एफडीए एक्टीव्ह मोडवर. एसएसबी समोरील स्टॉल्सची पहाणी. गाडेधारकांच्या पाण्याचे घेतले नमुने. स्टॉल्सवर जेवण करण्याची परवानगी नाही.

यापुढे जेवण करताना आढळल्यास परवाना निलंबित करणार, एफडीएचा इशारा.

बेतकी येथे दुचाकी अपघातात तरुण जखमी

बेतकी येथे दुचाकीचा झालेल्या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

हरमल येथे हिट अँड रन! चारचाकीच्या धडकेत भाऊ गंभीर जखमी

Arambol Hit And Run Case

हरमल येथे हिट अँड रन प्रकरण समोर आले असून, चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत चुलत भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

साहिल आणि दीप असे अपघातात जखमी झालेल्या भावांचे नाव असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरु आहे.

CM प्रमोद सावंत आणि सिक्वेरांनी घेतली NITI आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांची भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी NITI आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांची भेट घेऊन संवाद साधला.

गोवा सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने क्लायमेट आणि डिझास्टर रेझिलिएंट ग्रीनर गोवा प्रकल्पासाठी नियोजित केलेल्या संमिश्र वित्त सुविधेबद्दल त्यांना माहिती देण्यात आली.

GMC बाहेरील खाद्य पदार्थाचे सर्व गाडे तपासण्याचे FDA आदेश

गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलच्या बाहेर असणाऱ्या खाद्य पदार्थाच्या गाडेधारक गार्डनच्या अस्वच्छ पाण्याचा वापर करत असल्याचा खुलासा गोमेकॉ व्यवस्थापनाने केला होता. त्यामुळे गोमेकॉ बाहेरील गाड्यावरचे खाद्यपदार्थ न खाण्याची सूचना करण्यात आली होती.

दरम्यान, ही सूचना केवळ गोमेकॉ कर्मचाऱ्यांसाठी होती असे म्हणत त्यांन ती नोट मागे घेतली. पण, आता या प्रकरणाची एफडीएने दखल घेतली असून, GMC बाहेरील खाद्य पदार्थाचे सर्व गाडे तपासण्याचे आदेश जारी केले आहेत.

गाड्यांवर अस्वच्छता आढळल्यास त्यांना सील करण्याचे आदेश FDA ने दिले आहेत.

धक्कादायक! गोमेकॉ परिसरातील खाद्यपदार्थ गाडेधारक वापरतात गार्डनच्या नळांचे पाणी..

गोमेकॉ परिसरातील गाडेधारक आपल्या गाड्यांवर पिण्यासाठी तसेच अन्न पदार्थ शिजवण्यासाठी गार्डनच्या नळांचे पाणी (जे पिण्यायोग्य नसते) अशा पाण्याचा वापर करीत आहेत. त्यामुळे गोमेकॉतील सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनी गाड्यांवरील पाणी पिऊ नये,तसेच तेथील अन्न पदार्थ खाऊ नये अशा सूचना नोडल अधिकारी डॉ. उदय काकोडकर यांनी दिल्याची माहिती समोर येतेय.

पार्से खाजन गुण्डो बांध प्रकल्पाचे विद्रुपीकरण

काही मद्यधुंद युवकांकडून पार्से खाजन गुण्डो बांध प्रकल्पाच्या ठिकाणी बियरच्या काचेच्या बाटल्या फोडून, चिप्सचे प्लस्टिक, कचरा टाकून प्रकल्पाचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. या प्रकारामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला असून पोलिसांनी पेट्रोलिंग करून कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Glass bottles were broken and the area was disturbed
Glass bottles were broken and the area was disturbedDainik Gomantak

पोर्तुगीज पासपोर्ट प्रकरण! मुख्यमंत्री आणि मंत्री आलेक्स सिक्वेरांनी घेतली राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांची भेट

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांची दिल्लीत घेतली भेट; पासपोर्ट रद्द केल्यानंतर भारताचे परदेशी नागरिकत्वाचे कार्ड मिळविण्यात अडचणी येत असलेल्या समस्यांकडे लक्ष देण्याचे राज्यमंत्र्यांना केले आवाहन

आमदार विरेश बोरकरांचे आंदोलन अखेर मागे

आमदार विरेश बोरकर आणि कार्यकर्त्यांनी सुरु केलेले आंदोलन अखेर १५ तासांनंतर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून रात्री २ वाजता घेतले मागे. . बोरकर यांना सोमवार पर्यंत त्यांच्या सर्व तक्रारींची उत्तरे त्यांना देण्यात येतील असे आश्वासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

अतिक्रमण हटल्याने ‘स्मार्ट रोड’ला गती

पणजी, सांतिनेजमध्ये अतिक्रमणे हटल्याने स्मार्ट रस्त्याच्या कामाला गती आली आहे. मधुबन ते वेलनेस फार्मसीच्या रस्त्यावर काही झाडांचा बांधकामांचा अडथळा होता, तो हटवला आहे. अन्य काही अडथळे मनपाला हटवावे लागतील.

कळसा भांडुरा प्रकल्प मार्गी लावण्यात अपयश; सिद्धरामय्या यांची कर्नाटक विधानसभेत खंत

म्हादई (मांडवी) नदीचे पाणी कर्नाटकातील मलप्रभा नदीपात्रात वळविण्यासाठी निविदा काढण्याची सर्व तयारी कर्नाटक सरकारने केली होती.

मात्र, या कळसा-भांडुरा प्रकल्पाला केंद्रीय वन्यजीव मंडळाने मंजुरी देण्याबाबत निर्णय लांबणीवर टाकल्याने हा प्रकल्प तडीस लावता आला नाही, अशी खंत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरू येथील विधानसभेत २०२४-२५ सालचा अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com