Goa Police: मारहाणप्रकरणी तीन पोलिस निलंबित

Goa Police: सहाजणांना अटक : एक अजूनही फरार; दुसरा माफीचा साक्षीदार
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: माशेल येथे फास्ट फूड चालक विराज माशेलकर याच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणात म्हार्दोळ पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. एकाचे नाव-गाव काहीच माहिती नसल्यामुळे तो पोलिसांना सापडू शकला नाही तर अन्य एकाला माफीचा साक्षीदार बनविले आहे.

Goa Police
Sea Food In Goa: जाणून घ्या, सीफूडसाठी प्रसिद्ध गोव्यातील बीच

दरम्यान, या मारहाण प्रकरणात गुंतलेल्या तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्‍यात आले आहे. हेड कॉन्स्टेबल समीर फडते, कॉन्‍स्‍टेबल आकाश नावेलकर व मितेश गाड अशी त्‍यांची नावे आहेत. पोलिस मुख्यालयातून यासंबंधीचा आदेश काढण्यात आला आहे.

विराज याच्यावर रविवारी रात्री कॉन्‍स्‍टेबल समीर फडते याच्यासह अन्य चौघांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यावेळी तिघेजण दुकानाच्या बाहेर थांबले होते. मारहाण झाल्यानंतर सर्वांनी पळ काढला तर जखमी विराज माशेलकर याच्यावर इस्पितळात उपचार करण्यात आले होते.

या प्रकरणी पोलिसांनी आज मंगळवारी मुख्य संशयित व सध्या फोंडा पोलिस स्थानकात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत मारहाणप्रकरणी तीन पोलिस निलंबित

असलेला समीर शिवानंद फडते (४६, गावकरवाडा-बेतकी, खांडोळा), मितेश मोहनदास गाड (२७, कातरवाडा-नावेली), मितेशचा भाऊ मोहित मोहनदास गाड (२६, कातरवाडा-नावेली), सुप्रेश रामा सावर्डेकर (३१, हरवळे-साखळी),

विवेक घनशाम देसाई (२३, सोनशी-सत्तरी) व अस्मित अनिल साळुंके (२७, आंबेशीवाडा-आमोणे) यांना अटक केली आहे. या मारहाणीत गुंतलेला अन्य एक पोलिस कॉन्स्टेबल आकाश नावेलकर याने पोलिसांना तपासकार्यात सहकार्य केल्याबद्दल त्‍याला पोलिस स्थानकात बोलावून नोटीस देऊन सोडण्यात आले.

Goa Police
Breast Cancer: भीषण वास्तव! गोव्यात 1 लाखात 55 महिलांना स्‍तनाचा कर्करोग...

वारंवार समज देऊनही समीर नाही सुधारला

विराज माशेलकर याने मुख्य संशयित आरोपी समीर फडते याच्याविरोधात फोंडा व म्हार्दोळ पोलिस स्थानकात अनेकदा तक्रारी केल्‍या होत्‍या. त्‍यानंतर वेळोवेळी समीरला समज देण्यात आली होती, पण तो सुधारला नाही. उलट त्याने पोलिसी पेशाचा गैरवापर केला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com