सनबर्न होणार नाही,मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

दरम्यान काही दिवसांपूर्वी सनबर्न महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी एक प्रारंभिक अर्ज गोव्यातील वेगाटर येथे केला गेला होता
There will be no sunburn festival in state Chief Minister Pramod Sawant clarify
There will be no sunburn festival in state Chief Minister Pramod Sawant clarify Dainik Gomantak

राज्यात कोणत्याही स्थितीत यंदा सनबर्न उत्सव (Sunburn Festival) होणार नसल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांनी केला आहे. राज्य अमलीपदार्थमुक्‍त करण्यासाठी असे निर्णय घेतले जात आहेत. ‘त्या’ कंपनीने एखाद्या छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले असावे, त्याबाबत आपणास माहिती नाही, असेही ते एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना म्हणाले. (There will be no sunburn festival in state Chief Minister Pramod Sawant clarify)

पर्सेप्ट लाईव्हतर्फे दरवर्षी वागातोर समुद्र किनाऱ्‍यावर मेगा सनबर्न उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी आयोजकांनी सरकारकडे परवानगी मागितली होती, ती फेटाळण्यात आल्यानंतरही हा उत्सव होणार असल्याचे आयोजकांनी म्हटले होते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता कोणत्याही स्थितीत हा उत्सव होणार नाही. तसे निर्देश संबंधित खात्यांना देण्यात आले आहेत. त्याबाबतची प्रक्रिया माझ्या कार्यालयाकडून पूर्ण झाली आहे. आयोजकांनी दुसरा एखादा उत्सव आयोजित करून त्याला हेच नाव दिले असावे. त्यासाठीच्या परवानगीबाबत आपल्याकडे अर्ज आलेला नाही, असे देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

There will be no sunburn festival in state Chief Minister Pramod Sawant clarify
सनबर्न मोहोत्सवाला नियमासह 'हिरवा कंदील'..!

दरम्यान काही दिवसांपूर्वी सनबर्न महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी एक प्रारंभिक अर्ज गोव्यातील वेगाटर येथे केला गेला होता, गोवा सरकारने कोविड महामारीमुळे हा मोहोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आलेलेल्या माहिती नुसार यंदा हा मोहोत्सव अत्यंत साध्या स्वरूपात होणार असून या मोहोत्सवाला मर्यादित लोकांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती देखील समोर आली होती. मात्र आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच राज्यात कोणत्याही स्थितीत यंदा सनबर्न उत्सव होणार नसल्याचं सांगितल्याने सर्वच संभ्रमात पडलेले पाहायला मिळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com