Goa Flight : पुणे-गोवा विमान प्रवास लांबला! प्रवाशांची तारांबळ

Goa Flight : ८.३० तास उशिरा विमानोड्डाण
Goa Flight
Goa Flight Dainik Gomantak

Goa Flight : पणजी, पुणे ते मोपा-गोवा मार्गावरील विमानाला आज तब्बल साडेआठ तासांचा उशीर झाला. यामुळे अनेकजण पुणे विमानतळावर अडकून पडले. मुख्य म्हणजे सुरवातीला केवळ दोन तास उशिराने विमानोड्डाण होईल, असे ग्राहकांना कळवण्यात आले होते.

ते विमानतळावर आल्यावर एकेक तासाने उशीर वाढवत गेला. यामुळे विमानतळावरच प्रवासी अडकून पडले. दुपारी साडेबारा वाजताचे हे विमान रात्री अखेर ८.३३ वाजता गोव्याला येण्यास निघाले.

स्पाईस जेट कंपनीचे हे विमान दुपारी १२.३० वाजता पुण्यातून मोपा येथे निघण्यास निघते. ते विमान दोन तास उशिराने निघेल अशी कल्पना प्रवाशांना काल मध्यरात्रीच्या दरम्यान देण्यात आली होती. आज त्यानुसार प्रवासी पुणे विमानतळावर आले असता त्या उशिरात आणखीन दोन तासांचा भर घालण्यात आली.

त्यानंतर तासाभराने विमान सहा तास उशिरा निघणार असे सांगण्यात आले. यामुळे प्रवासी हवालदिल झाले. त्यांच्यापैकी अनेकांना या दरम्यान खाद्यपदार्थही विमान कंपनीने पुरवले नाहीत.

या विमानातून पिसफुल सोसायटीचे सचिव कुमार कलानंद मणी गोव्यात यायचे होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारची घोषणा विमान कंपनीकडून न केल्याने प्रवाशांत गोंधळ उडाला होता. कंपनीच्या कांऊंटरवर चौकशी केली असता रात्री ८ वाजल्यानंतर विमान निघू शकेल.

आता दिल्लीत त्या विमानात प्रवासी बसत आहेत, असे सायंकाळी सहा वाजता सांगण्यात आले. तेथे कंपनीने काही खानपानाची व्यवस्था केली आहे, अशी विचारणा केल्यावर एक पावाचा तुकडा, दोन अत्यंत थंडगार असे सामोसे व फ्रुटी देण्यात आली.

Goa Flight
Goa Mining: मयेतील खनिज वाहतुकीस न्यायालयात आव्हान

मारहाणप्रकरणी हवाई वाहतूक बंदी!

एका घटनेत काल दिल्लीतून गोव्यात निघणाऱ्या विमानाला उशीर होणार अशी घोषणा करणाऱ्या पायलटाला एका प्रवाशाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

इंडिगो कंपनीच्या विमानात तो प्रकार घडल्याचा व्हिडिओ एका रशियन व्यक्तीने समाज माध्यमावर उपलब्ध केला आहे. या प्रकरणात पायलटाला मारहाण करण्याचा आरोप असलेला प्रवासी साहिल कटारीया याच्यावर हवाई वाहतूक बंदीची कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com