Goa Politics: प्रकाश वेळीप - रमेश तवडकर वादावर अखेर पडला पडदा!

Goa Politics: हक्कभंग टळला: गावडेंचीही नरमाईची भूमिका
Goa Assembly Session 2024| Speaker Ramesh Tawadkar
Goa Assembly Session 2024| Speaker Ramesh TawadkarDainik Gomantak

Goa Politics: माजी मंत्री प्रकाश वेळीप यांना अखेर हक्कभंग विरोधातील कारवाईला सामोरे जावेच लागले नाही. आपण आणि मुख्यमंत्र्यांनी वेळीप यांच्याशी चर्चा केली. तो प्रश्न संपला असे सांगून सभापती रमेश तवडकर यांनी या विषयावर विधानसभेत पडदा पाडला.

दरम्यान, आपल्यासाठी हा वाद आता संपल्याने मी काही बोलणार नाही अशी भूमिका कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनीही घेतली.

खोतिगावमधील एका वाड्यावर कला व संस्कृती खात्याने विविध कार्यक्रमांसाठी 26 लाख रुपयांचे अनुदान दिले होते. ते कार्यक्रमच झाले नाहीत असा आरोप तवडकर यांनी केल्यानंतर हा वाद सुरू झाला. त्यानंतर गावडे हे आदिवासी कल्याण संचालक दशरथ रेडकर यांच्याशी सैल शब्दांत बोलल्याची ध्वनिफीत सार्वजनिक झाली.

त्याआधी सभापती रमेश तवडकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मंत्री गोविंद गावडे यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर ही ध्वनिफीत सार्वजनिक झाल्याने मिटणारा वाद वाढला होता.

Goa Assembly Session 2024| Speaker Ramesh Tawadkar
Goa Azad Maidan: राजधानी पणजीमध्ये असलेले आझाद मैदान या कारणासाठी आहे प्रसिद्ध...

त्यातच माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी तवडकर यांच्यावर आरोप केले, तवडकर यांनीही त्याला उत्तर दिले. त्यानंतर तवडकर यांनी वेळीप यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई सुरू केल्याची माहिती विधानसभेत देत समन्सही बजावले होते.

भाजप सरकारच्या काळात भाजपच्याच एका नेत्याविरोधात हक्कभंगाची कारवाई सुरू झाल्याने पक्षीय पातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली. नेत्यांनी आपले वैयक्तिक अभिनिवेश पक्षीय हिताआड आणू नयेत असे पक्षीय पातळीवरून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीप आणि तवडकर यांची एकत्रित बैठक घेऊन वाद मिटवला.

आता लक्ष गौड मराठा समाजाच्या भूमिकेकडे

विधानसभा अधिवेशन बेमुदत तहकूब करण्याआधी सभापतींनी आपण व मुख्यमंत्री संयुक्तपणे वेळीप यांच्याशी बोललो. तो विषय सामंजस्याने सोडवला असे निवेदन केले. त्यामुळे हा वाद मिटेल असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी गौड मराठा समाज कोणती भूमिका घेतो याकडे मात्र लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com