Ponda News: आक्षेपार्ह पोस्टमुळे फोंडा शहरात तणाव

Ponda News: अल्‍पवयीनासह चौघेजण ताब्‍यात
Ponda News
Ponda NewsDainik Gomantak

Ponda News: अयोध्या भूमीसंबंधी फोंडा भागातील काही जणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्‍याने गुरुवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, हिंदुत्ववादी संघटनांनी संयम पाळल्याने आणि फोंडा पोलिसांनी कारवाई करण्यास प्रारंभ केल्याने तणाव निवळला.

Ponda News
Carnival In Goa: फेब्रुवारी महिना पर्यटकांसाठी ठरणार मनोरंजनाची मेजवानी

पोलिसांनी या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी एका अल्‍पवयीनासह चौघाजणांना ताब्यात घेतले असून, उर्वरित संशयितांना शुक्रवारी 26 तारखेपर्यंत अटक न केल्यास मोर्चा आणण्याचा इशारा दिला आहे.

आक्षेपार्ह पोस्ट करणारे संशयित कुर्टी तसेच दत्तगड बेतोडा भागातील आहेत. चार जणांपैकी दोघांना हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकत्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. हा आक्षेपार्ह पोस्टचा प्रकार समजल्यानंतर विविध हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यानी फोंडा पोलिस स्थानकावर धाव घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणात मत (कमेन्‍ट) केलेल्यांमध्‍ये एकूण अठरा जण सहभागी असल्याची माहिती समोर आली.

पोलिस ठाण्‍यासमोर जमला मोठा जमाव

सर्व संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना आधी माफी मागायला लावा, अशी मागणी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली. संघटना प्रतिनिधींची पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्याशी बैठक झाली.

त्यानंतर एका अल्‍पवयीनासह चौघाजणांना रात्री उशिरा ताब्यात घेण्‍यात आले. उर्वरितांना उद्या शुक्रवारपर्यंत ताब्यात घेऊ, असे पोलिस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर जमाव पांगला.

मात्र, सर्वांना अटक न केल्यास शुक्रवारी मोर्चा आणू, असा इशारा सर्व संघटनांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com