Porvorim: पर्वरीत तणाव! प्रभू श्री रामाचे पोस्टर अज्ञाताने फाडले, पोलीस सतर्क

राम भक्तांनी या प्रकरणात सरकारने लक्ष घालून दोषीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Porvorim, Goa
Porvorim, GoaDainik Gomantak

Porvorim, Goa: अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त देशात सध्या जल्लोषाचे वातावरण आहे. दरम्यान, या जल्लोषाला गालबोट लागल्याची घटना पर्वरीतून समोर आली आहे.

पर्वरीत लावण्यात आलेले प्रभू श्री रामाचे पोस्टर अज्ञाताने फाडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्वरीत सार्वजनिक ठिकाणी प्रभू श्री रामाचे पोस्टर उभारण्यात आले होते, त्यावर रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची माहिती देण्यात आली होती. हे पोस्टर अज्ञात व्यक्तीने फाडले असून, हा व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, परिसरात पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

राम भक्तांनी या प्रकरणात सरकारने लक्ष घालून दोषीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचे वातावरण असून, सरकारने देखील नागरिकांना दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

गोव्यात सरकारी कार्यालये आणि आस्थापनांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. गोव्यात सध्या भाजप नेते विविध मंदिरात सेवाकार्य करत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह विविध नेत्यांनी राज्यातील विविध मंदिरात स्वच्छता केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com