Panaji News : दिव्यांगांच्या मदतीला तंत्रज्ञान; उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी संगणकासह ध्वनिवर्धकाचा वापर

Panaji News : सावंत यांनी असे तंत्रज्ञान वापरण्यासाठी दोन वर्षे गावठणकर याला प्रशिक्षण दिले. दिव्यांग विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी लेखनिक मिळू शकतो; पण आपणच परीक्षा दिली पाहिजे, अशी साहीलची जिद्द होती.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत सांताक्रूझ हायस्कूलमधील परीक्षा केंद्रात साहील गावठणकर हा दिव्यांग विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या शारीरिक उणिवांवर मात करताना दिसत आहे.

उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी संगणक व ध्वनिवर्धकाचा वापर तो करतो. राज्याच्या इतिहासात असा हा पहिलाच प्रयोग असावा.

संगणकाच्या साहाय्याने प्रश्न ऐकून, त्याचे टंकलेखन करून तो उत्तरे लिहितो. सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले महादेव सावंत, जे नॅशनल ब्लाईंड असोसिएशन ऑफ गोवा या संस्थेचे सदस्य आहेत, त्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

सावंत यांनी असे तंत्रज्ञान वापरण्यासाठी दोन वर्षे गावठणकर याला प्रशिक्षण दिले. दिव्यांग विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी लेखनिक मिळू शकतो; पण आपणच परीक्षा दिली पाहिजे, अशी साहीलची जिद्द होती.

ती तो पुरी करत आहे. लेखनिक घेतला तर त्याला उत्तर समजावून सांगितल्यावर तो आपल्याला हवे तसेच उत्तर लिहील, याची शाश्वती नसते. त्यामुळे या विद्यार्थ्याने हा मार्ग चोखाळला आहे. सावंत यांनी शोधलेल्या अभिनव पद्धतीमुळे संगणकच त्यात असलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे ध्वनिरूपाने दिव्यांग विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करतो.

दृष्टिहीनांनाही प्रशिक्षण देण्याची तयारी

या तंत्रज्ञानाचे सादरीकरण गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर करण्यात आले आणि मंडळाची रितसर मान्यता घेण्यात आली. याला मान्यता मिळण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी विशेष सहकार्य केले. सावंत यांनी सादरीकरण करतेवेळी कोणत्याही स्तरावर शिकत असलेल्या दृष्टिहीन विद्यार्थ्याला यासंदर्भात प्रशिक्षण देऊन साहाय्य करण्याची आपली तयारी असल्याचे नमूद केले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअर

हा प्रश्न विद्यार्थ्याला कळेपर्यंत सादर करण्याची सोय संगणकात आहे. प्रश्न नीट ऐकल्यानंतर दिव्यांग टंकलेखन करून उत्तर लिहितो.

अशाप्रकारे सर्व प्रश्नपत्रिका सोडविली जाते. विशेष म्हणजे, या सर्व प्रक्रियेत दुसऱ्या व्यक्तीची गरज भासत नसल्यामुळे दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. यासाठीचे सॉफ्टवेअर सावंत यांनी तयार केले आहे.

Panaji
Goa Congress: गोव्याचा आवाज भारताचा आवाज बनेल! पत्रादेवी येथून काँग्रेस प्रचाराचा शुभारंभ

साहील हा दिव्यांग विद्यार्थी स्वयंपूर्ण रीतीने दहावीचा पेपर सोडवताना व्यवस्थेची पाहणी करताना गोवा बोर्डचे दक्षता सदस्य प्रा. रामचंद्र नाईक देसाई. सोबत परीक्षा प्रमुख बीना कामत शंखवाळकर, महादेव सावंत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com