LLB Admission Scam: बीए एलएलबीसाठी फेरप्रवेश परीक्षेला विद्यार्थी-पालकांचा विरोध! कारे महाविद्यालयाजवळ निदर्शने

बीए एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फेर प्रवेश परीक्षा देण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला प्रवेश मिळालेले विद्यार्थी आणि पालकाकडून विरोध दर्शवण्यात आला आहे.
LLB Admission Scam
LLB Admission ScamDainik Gomantak

LLB Admission Scam: कारे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य साबा डा सिल्वा यांनी प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ घातल्याचे गोवा विद्यापिठाच्या चौकशीत उघड झाले होते. त्यानंतर काल रात्री विद्यापीठाने पूर्वीची सर्व प्रक्रिया रद्द करीत नव्याने परीक्षा घेण्याचे परिपत्रक जारी केले होते. त्यामुळे या अभ्यासक्रमात यापूर्वी प्रवेश मिळालेल्या १६० विद्यार्थ्याना परत परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

LLB Admission Scam
Salim Ali Bird Sanctuary Goa : पक्षी अभयारण्यात चोडणवासीयांना मोफत प्रवेश द्या : ग्रामसभेत मागणी

मात्र बीए एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फेर प्रवेश परीक्षा देण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला प्रवेश मिळालेले विद्यार्थी आणि पालकाकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. याबाबत असंतोष व्यक्त करत पालक-विद्यार्थ्यांनी कारे विधी महाविद्यालयाजवळ निदर्शनाला सुरुवात केली आहे. तरी विद्यापीठाने हे परिपत्रक मागे घ्यावे अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा संतप्त पालक आणि विद्यार्थीवर्गाने दिला आहे.

आपल्या मुलाच्या फायद्यासाठी बीए एलएलबी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रियाच बदलणारे कारे कायदा महाविद्यालयाचे वादग्रस्त प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा यांच्याविरोधात पालक आणि विद्यार्थी आता आक्रमक झाले असून नवीन निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जमावाने केली आहे.

याबाबत नेमका काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com