व्यावसायिक महाविद्यालयांकडे गोव्यातील विद्यार्थ्यांची पाठ

विशेष म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहिल्याने ही चिंतेची बाब आहे.
College
CollegeDainik Gomantak

पणजी : राज्यातील खासगी व्‍यावसायिक महाविद्यालये मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. तरी देखील त्यात जाण्याऐवजी विद्यार्थी सरकारी महाविद्यालयांमध्ये जाण्याची पसंती दशर्वत असून त्यांनी खासगी महाविद्यालयांकडे पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहिल्याने त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे.

वैद्यकीय, औषध, तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमात अनेक खासगी व्यावसायिक महाविद्यालये आहेत. यात शिरोडा येथील आयुर्वेद महाविद्यालय, कामाक्षी होमिओपॅथी महाविद्यालय वैद्यकीय क्षेत्रात आहेत. फार्मागुढी येथील राजाराम आणि ताराबाई महाविद्यालय आहे. वेर्णा येथील पाद्रे कॉन्सेसांव महाविद्यालय, फातोर्डा येथील डॉन बॉस्को महाविद्यालय, आग्नेल पॉलिटेक्निक, शिरोडा येथील रायेश्वर महाविद्यालयासारखी अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत, परंतु त्यांच्याकडे विद्यार्थ्यी पाठ करत असल्याची माहिती समोर आली आहे.

College
Goa Accident : कार नाल्यात कोसळून भीषण अपघात; चौघांना वाचवलं

दुप्पट शुल्काचा परिणाम

खासगी ऐवजी सरकारी व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये जाण्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे शिक्षण शुल्क. सरकारी महाविद्यालयातील शुल्काच्या तुलनेत खासगी महाविद्यालयात ते दुप्पट असल्याने मोठा फरक पडतो. त्यामुळे सरकारी महाविद्यालयात जाण्याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचा कल असतो. दुसरा मुद्दा म्‍हणजे सरकारी महाविद्यालयांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता चांगली मिळत असल्याचा समज आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी हा मुद्दा ध्यानात ठेवून निर्णय घेतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com