Khandola News : ‘स्वच्छ सुंदर’ गावासाठी प्रयत्न करा: मंत्री गोविंद गावडे

Khandola News : माशेलात ‘चिल्ड्रन पार्क’साठी भूमिपूजन
minister Govind Gaude
minister Govind GaudeDainik Gomantak

Khandola News : खांडोळा, ग्राम विकास करणे, गावासाठी लागणाऱ्या साधनसुविधा पुरविणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे, पण या साधनसुविधांची देखभाल करणे ही ग्रामस्थांची जबाबदारी आहे.

तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवणे, हे ग्रामस्थांचेही कर्तव्य असून ‘स्वच्छ, सुंदर ग्राम’साठी ग्रामस्थांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत मंत्री गोविंद गावडे यांनी माशेल येते चिल्ड्रन पार्कच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केले.

व्यासपीठावर जि. पं. सदस्य श्रमेश भोसले, सरपंच जयेश नाईक, उपसरपंच सुमित्रा नाईक, आरडीएचे अभियंते चिन्मय मोरजकर, पंच सदस्य अन्य पंचायतीचे सरपंच व पंच सदस्य उपस्थित होते. ‘चिल्ड्रन पार्क’प्रकल्प आरीडीएममार्फत पूर्ण करण्यात येणार आहे.

माशेल-खांडोळा पंचक्रोशीचा झपाट्याने विकास होत असून ही गावांची शहरीकरणांकडे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे या परिसराचा योग्य पद्धतीने विकास होणे आवश्‍यक आहे. लोकसंख्या, घरांची संख्या वाढल्यामुळे सुविधांवर ताण येतो. जल, वीज, रस्त्यांच्या समस्या आहे. त्या सोडविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य सुरू आहे.

यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य हवे, प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. कचरा कमी केला पाहिजे, पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे. पाण्‍याच्या नव्या टाक्यासाठी जागाही उपलब्ध केली पाहिजे. या गोष्टी कर्तव्यभावनेतून करायलाच हव्या, असेही गावडे म्हणाले. सरपंच जयेश नाईक यांनी स्वागत केले. प्रतीक आमोणकर यांनी सूत्रसंचालन केले.

minister Govind Gaude
Pub House In Goa: भाजप उपाध्यक्षाचे पब हाऊस सील; वेश्‍या व्यवसाय रोखला

पंचक्रोशीचा गतीने विकास!

जि. पं. सदस्य श्रमेश भोसले म्हणाले, पंचायतीतर्फे पंचक्रोशीचा गतीने विकास होत आहे. परिसर स्वच्छतेसाठी पंचायत दक्ष आहे. बाजारातील नाल्याची सफाई केली, पण त्यानंतर नाल्यात पुन्हा कचरा टाकला जात आहे. अशा चुकीच्या प्रकारामुळे नाला पुन्हा कचऱ्याने भरत आहे. याबाबत पंचायतीने कडक कारवाई करायला हवी. ग्रामस्वच्छतेसाठी तडजोड करू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com