SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

SSC Result Sanguem : नेत्रावळी येथील सरकारी हायस्कूलने सलग आठ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखताना तालुक्‍यात पहिले तिन्‍ही क्रमांक पटकावले. सांगे तालुक्यातील प्रथम येण्याचा मान वैष्णवी प्रदीप गावकर (९४.८३ टक्के) हिने मिळविला.
SSC Result Sanguem
SSC Result SanguemDainik Gomantak

SSC Result Sanguem :

सांगे, तालुक्यातील दहावी परीक्षेचा निकाल उत्‍कृष्‍ट लागला. विशेष म्‍हणजे सरकारी हायस्कूलने उज्ज्‍वल यश संपादन केले.

नेत्रावळी येथील सरकारी हायस्कूलने सलग आठ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखताना तालुक्‍यात पहिले तिन्‍ही क्रमांक पटकावले. सांगे तालुक्यातील प्रथम येण्याचा मान वैष्णवी प्रदीप गावकर (९४.८३ टक्के) हिने मिळविला. राधा चिन्मय तानशीकर (९२.५०) द्वितीय तर साक्षी उल्हास गावकर (८७.८३) हिने तृतीय क्रमांक प्राप्‍त केला.

तालुक्यातील खासगी विद्यालयांच्‍या तुलनेत सरकारी विद्यालयांनी चांगला निकाल दिला आहे. १०० टक्के निकाल देणाऱ्या सरकारी विद्यालयांमध्‍ये सरकारी हायस्कूल नेत्रावळी, सरकारी हायस्कूल वाडे-कुर्डी, सरकारी हायस्कूल वालंकिणी, सरकारी हायस्कूल काले, सरकारी हायस्कूल कोळंब-रिवणचा समावेश आहे.

SSC Result Sanguem
Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

वैष्णवीची इच्‍छा डॉक्टर होण्याची

नेत्रावळीसारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन ६०० पैकी ५६९ गुण प्राप्त करत वैष्णवी प्रदीप गावकर हिने उज्ज्‍वल यश संपादन केले आहे. विशेष म्‍हणजे कोणत्याही प्रकारचे ट्युशन न घेता तिने हे यश मिळविले आहे. ‘‘आम्‍हाला वैष्‍णवीच्‍या अभ्‍यासाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्‍हता. तरीसुद्धा तिने एवढे मोठे यश मिळविले आहे’’ असे सरकारी कर्मचारी असलेल्‍या तिच्‍या आई-वडिलांनी सांगितले. दरम्‍यान, वैष्‍णवीने पुढे

डॉक्टर होण्याचा मानस व्यक्त केला आहे. तिला इंग्रजीत ८२, हिंदी संस्कृत ९६, मराठीत ९७, समाजशास्र ९८, विज्ञान ९६ तर गणितात ८४ गुण मिळविले आहेत. शिवाय टुरिझम ॲण्‍ड हॉस्पिटीलिटी विषयात तिने ९८ गुण प्राप्‍त केले आहेत.

सरकारी विद्यालये चांगली कामगिरी करत आहेत हे राज्यातील दहावीच्‍या निकालाने स्‍पष्‍ट केले आहे. परंतु सरकारकडून या विद्यालयांना त्या मानाने सुविधा पुरविल्‍या जात नाहीत. किमान आता तरी सरकारने जागे होऊन सरकारी विद्यालयांकडे प्राधान्‍याने लक्ष द्यावे.

- चिन्मय तानशीकर, पालक-शिक्षक संघ अध्यक्ष (नेत्रावळी सरकारी हायस्‍कूल)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com