Panjim Smart City: स्मार्ट सिटीच्या कामांची जबाबदारी सल्लागाराची; मंत्री बाबूश यांनी पुन्हा हात झटकले

स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कंत्राटदाराला वैयक्तिक मुदत दिली गेली आहे.
Babush Monserrate on Smart city work
Babush Monserrate on Smart city work Dainik Gomantak

Panjim Smart City: पणजीत सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे मे महिन्याच्या 31 तारखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे माझे काम असल्याचे सांगत मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी कामे हलक्या दर्जाची झाली असली तर त्यास सल्लागार जबाबदार आहे, कारण त्याच्यावर कोट्यवधी रुपये उधळले गेले आहेत, असे स्पष्टीकरण दिले.

सचिवालयात राज्याचे मुख्य सचिव तथा इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडटचे (आयपीएससीडीएल) चेअरमन पुनित गोयल यांच्यासमवेत मंगळवारी सकाळी आयपीएससीडीएलचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका अभियंते, आयपीएससीडीएलचे सल्लागार व कंत्राटदारांची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर आमदार बाबशू यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कंत्राटदाराला वैयक्तिक मुदत दिली गेली आहे.

सर्वप्रथम मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करून रस्ता डांबरीकरण करण्याचे काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत. आपल्याला स्मार्ट सिटीच्या सीईओने 31 मेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे यापूर्वी आश्वासन दिले आहे, त्यानुसार आपण त्या कामे पूर्णत्वासाठी पाठपुरावा करु, परंतु कामाच्या दर्जाविषयी त्यांनी यापूवींच भूमिका मांडली.

स्मार्ट सिटीची कामे हलक्या दर्जाची झाल्यास त्यासाठी सल्लागारांना जबाबदार धरले जाईल, कारण त्यांच्यावर कोट्यवधी रुपये उधळले आहेत. सर्व कामे 31 पूर्वी पूर्ण करणे एवढेच माझे काम आहे.

पण, स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होईपर्यंत पावसाचे आगमन होऊ नये एवढीच अपेक्षा, असल्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com