चोवीस तासात सहा बळी

1
1

पणजी

: राज्यात कोरोनाबाबतची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांत वास्को येथील १४ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांमधील ती सर्वांत लहान व्यक्ती आहे. आज पेडणे येथील रेडकर इस्पितळात चार जणांवर कोरोना लसीचा प्रयोग करण्यात आला असून गेल्या चोवीस तासात राज्यात १४६ जण कोरोनाबाधित आढळले, तर १८२ रुग्ण बरे झाल्याने राज्यात सध्या १६०६ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.
ज्या कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामध्ये चोडण येथील ८० वर्षीय महिला, वास्को येथील ६५ वर्षीय महिला, साखळी येथील ८० वर्षीय पुरुषाचा, ५३ वर्षीय झुआरीनगर येथील व्यक्तीचा आणि वास्को येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या तिघांचा मृत्यू कोविड इस्पितळात झाला असून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील इस्पितळात झाल्याची माहिती मिळाली.
चोडण येथील एक ८० वर्षाची एक महिला रुग्ण मरण पावली. २२ जुलै रोजी मधुमेह व हायपर टेन्शनचा आजार असल्यामुळे तिला जीएमसीमध्ये भरती केली होती. त्या ठिकाणी तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे ती कोविड हॉस्पिटलात उपचार घेत होती, तिच्याशी संपर्क आलेल्यांची चाचणीही केली, परंतु अहवाल आला नाही.


६८६० जणांच्या
अहवालाची प्रतीक्षा
गेल्या चोवीस तासात ३०१३ जणांच्या कोविड पडताळणी चाचण्या करण्यात आल्या, तर १९५७ जणांचे अहवाल हाती आले आहेत. आजच्या दिवशी १३ देशी प्रवाशांना आणि २ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ३८ जणांना ठेवण्यात आले. अद्याप ६८६० जणांचे अहवाल हाती आलेले नसून प्रलंबित आहेत.


दरम्यान ट्रेन, विमान आणि रस्तामार्गे आलेले १०९ रुग्ण आहेत. डिचोली आरोग्य केंद्रात ३ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ७३ रुग्ण, पेडणे आरोग्य केंद्रात ७ रुग्ण, वाळपई आरोग्य केंद्रात ८ रुग्ण, म्हापसा आरोग्य केंद्रात ४४ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात ४८ रुग्ण, बेतकी आरोग्य केंद्रात ७ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात २३ रुग्ण, कोलवाळे आरोग्य केंद्रात ४७ रुग्ण, खोर्ली आरोग्य केंद्रात १७ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात ६१ रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्रात २७ रुग्ण, कुडचडे आरोग्य केंद्रात १५ रुग्ण, काणकोण आरोग्य केंद्रात ६ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात ९५ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात ३६० रुग्ण, लोटली आरोग्य केंद्रात २६ रुग्ण, मेरशी आरोग्य केंद्रात ८ रुग्ण, केपे आरोग्य केंद्रात ८ रुग्ण, सांगे आरोग्य केंद्रात ४ रुग्ण, शिरोडा आरोग्य केंद्रात ५ रुग्ण, धारबांदोडा आरोग्य केंद्रात ४५ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात ४२ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात २९ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

तेजश्री कुंभारराज्यात कोरोनाबाबतची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांत वास्को येथील १४ वर्षीय मुलीचाही समावेश आहे

संपादन ः संजय घुग्रेटकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com