श्रेया रामचंदानीचे अतुलनीय यश ः भार्ई नायक

1
1

मडगाव

नामांकित शाळांच्या तुलनेत एकेकाळी दुय्यम शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दामोदर इंग्लिश विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया रामचंदानी आज राज्यात पहिला क्रमांक पटकावते, हे या शाळेसाठी व शाळेचे संचालन करणाऱ्या मठग्रामस्थ हिंदू सभेसाठी गौरवशाली बाब आहे. समाजातील कमकुवत घटकासाठी सुरू केलेल्या या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेऊन शाळेला मिळवून दिलेले यश हुरूप वाढवणारे आहे, असे मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष पांडुरंग (भाई) नायक यांनी सांगितले.
या शाळेची विद्यार्थिनी श्रेया रामचंदानी हिने ९६.६६ टक्के गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला. शाळेला तिने मिळवून दिलेले यश अतुलनीय आहे, असे नायक यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आकांक्षा साळगावकर, निवृत्त मुख्याध्यापिका दत्ती कुंदे, दामोदर विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजीव देसाई, मठग्रामस्थ हिंदू सभेचे सदस्य नारायण (नाना) फोंडेकर, शाळेच्या व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी रीमा कुंदे व मार्गदर्शक अनिल पै उपस्थित होते.
शाळेचा निकाल ५० टक्के लागायचा तेव्हा तेही मोठे यश मानण्याचा एक काळ होता. या शाळेत मुले कमकुवत घटाकातील यायची. नामांकित शाळांत प्रवेश न मिळणारे विद्यार्थी या शाळेत यायचे. खरेतर त्यांना शिकण्याची संधी मिळावी, म्हणूनच आमच्या वाडवडिलांनी ही शाळा सुरू केली होती. आज या शाळेला मिळालेल्या यशाची आम्ही कल्पनाही केली नव्हती. या शाळेला आकार देण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचे आज चीज झाले आहे, असे नायक यांनी सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले. व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी रीमा कुंदे व निवृत्त शिक्षक अनिल पै यांचेही विद्यार्थी व शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. दिवंगत शिक्षणतज्ज्ञ भिकू पै आंगले यांच्या नंतर पै यांनी शाळेला दिशा देण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडली असे नायक यांनी सांगितले.
श्रेया रामचंदानी हिने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, पालक व व्यवस्थापनाला दिले. आपण शाळेची सदैव ऋणी असेन असे तिने सांगितले. goa goa goa

Editing _ sanjay ghugretkar

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com