Mopa Airport: टॅक्सी चालकांनी मोपा विमानतळावरील सुरक्षा रक्षाकाला मारहाण का केली? 50-60 जणांविरोधात गुन्हा

सुरक्षा रक्षक दुपारी काम आटोपून न्हयबाग येथील खोलीवर परतत असताना वारखंड येथे क्रिकेट मैदानाजवळ अडवून मारहाण
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak

Mopa Airport: मोपा विमानतळावरील सुरक्षा रक्षकाला मारहण केल्याची घटना मंगळवारी (दि.30) दुपारी उघडकीस आली. वारखंड येथे क्रिकेट मैदानाजवळ अडवून सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. याप्रकरणी टॅक्सीचालकांसह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोबिनदा गोचायत (रा. न्हयबाग, मूळ रा. ओडिशा) असे मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षक गोबिनदा दुपारी काम आटोपून आपल्या न्हयबाग येथील खोलीवर परतत होता. यावेळी वारखंड येथील क्रिकेट मैदानाजवळ टॅक्सीचालकांसह 50 ते 60 जणांच्या जमावाने त्याला अडवून मारहाण केली.

या प्रकरणी रामा वरक, निखिल, संकेत ओंकार महाले यांच्यासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

का केली मारहाण?

टॅक्सी चालकांनी मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेकायदेशीर प्रवासी घेऊन जात आहेत. याबाबत सुरक्षा रक्षक गोबिनदा गोचायत यांनी विमानतळ पोलीस स्थानकात तक्रार केली होती. याचाच राग मनात धरुन टॅक्सी चालकांसह 50 ते 60 जणांच्या जमावाने सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची माहिती समोर आळी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com