Bicholim News : स्मशानभूमीतील भंगार साहित्य चोरले अन् विकले ; डिचोली पोलिसांत तक्रार

Bicholim News : प्रकरणात माजी पंचसदस्याचा हात असल्याचा आरोप
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, साळ पंचायत क्षेत्रातील पुनर्वसन वसाहतीतील शासकीय स्मशानभूमीतील किंमती भंगार साहित्याची चोरी करुन, ते परस्पर विकण्यात आले आहे, अशी तक्रार काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते मेघ:श्याम राऊत यांनी आज (शुक्रवारी) डिचोली पोलिसांत केली आहे.

या प्रकरणात एका माजी पंचसदस्याचा हात आहे, असा दावा राऊत यांनी केला असून, संबंधीत पंचसदस्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करावी,अशी मागणी केली आहे.

साळ येथील पुनर्वसन वसाहतीतील सर्व्हे क्र. १३०/१-ए या जमिनीत असलेल्या शासकीय स्मशानभूमीचे विकसन काम करण्यात येत आहे. त्यासाठी पूर्वीचे बांधकाम पाडण्यात आले आहे. स्मशानभूमीचे पूर्वीचे लोखंडी रॉड, पत्रे आदी भंगार सामान स्मशानभूमीत ठेवण्यात आले होते. हे सामान आता तेथून अचानक गायब झाले आहे.

Bicholim
Go First: प्रवाशांच्या समस्येत वाढ, 12 मे पर्यंत गो फर्स्टच्या सर्व फ्लाइट रद्द

साधारणतः दोन ते तीन लाख रुपये किंमतीचे स्मशानभूमीतील पूर्वीचे हे सामान चोरून त्याची परस्पर विक्री करण्यात आली आहे, असे मेघ:श्याम राऊत यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

सदर सामान एका माजी पंचसदस्याने चोरले असून, त्याला अटक करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संबंधित माजी पंचायत सदस्याचे नावही मेघ:श्याम राऊत यांनी पोलिसांना दिले आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे, अशी ग्वाही पोलिस अधिकाऱ्यांनी मेघ:श्याम राऊत आणि इतरांना दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com