Sanquelim News : कचरा हाताळणीसाठी जागा उपलब्ध करा ; कारापूर-सर्वण सरपंचांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

वाठादेव सर्वण ते कारापूरपर्यंत संपूर्ण रस्त्याच्या बाजूला कचरा फेकण्याचे प्रकार वाढले आहेत.
Garbage On Road
Garbage On Road Dainik Gomantak

Sanquelim News : साखळी, मये मतदारसंघातील कारापूर सर्वण पंचायत कचरा समस्येने हैराण आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सरपंच दत्तप्रसाद खारकांडे प्रयत्नशील आहेत, परंतु कचरा हाताळणीसाठी पंचायतीकडे जागा नसल्याने अडचण येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कचरा हाताळणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याने या समस्येवर तोडगा काढणे शक्य होणार, असा विश्‍वास सरपंच खारकांडे यांनी व्यक्त केला.

पंचायत क्षेत्रात कचऱ्याची समस्या उग्र बनत चालली आहे. वाठादेव सर्वण ते कारापूरपर्यंत संपूर्ण रस्त्याच्या बाजूला कचरा फेकण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर उपाय काढण्यासाठी सरपंच खारकांडे यांनी साखळी व डिचोली पालिकांना साकडे घातले.

विठ्ठलापूर, कारापूर तिस्क व विजयानगर या चार प्रभागांचा कचरा साखळी पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात तर

वाठादेव भागातील तीन प्रभागांतील कचरा डिचोली पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात हाताळावा यासाठी सरपंच खारकांडे यांनी दोन्ही मुख्याधिकाऱ्यांशी अनेक बैठका घेतल्या, पण त्याचा कोणताही लाभ झाला नाही.

अखेर सरपंच खारकांडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनीही येथील एका कार्यक्रमात बोलताना कचरा हाताळणीसाठी स्वतंत्र जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कचऱ्याची समस्या सुटेल, असा विश्‍वास खारकांडे यांनी व्यक्त केला.

Garbage On Road
Goa Petrol Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे दरात किरकोळ बदल, टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या ताजे भाव

६२ जणांकडून मारून घेतल्या जिरवण्या

घरांतील सांडपाणी थेट रस्त्यावर किंवा गटरांमध्ये सोडले जाते. याबाबत नोटीस बजावली लोक दाद देत नाहीत, तरीही आपण नोटिसा बजावल्या.

त्यापैकी ६२ जणांकडून सोकपीट मारून घेत उघड्यावर सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले, असे खारकांडे यांनी सांगितले.

लवकरच घरोघरी कचरा गोळा करण्याची मोहीम

पंचायत क्षेत्रातील लोकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच उघड्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला फेकू नये. पंचायतीतर्फे लवकरच विठ्ठलापूर भागात पहिल्या टप्प्यात तर वाठादेव भागात दुसऱ्या टप्प्यात घरोघरी कचरा गोळा करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे, असे खारकांडे यांनी सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com