Sanguem News : ‘गौळादेवी’चा शनिवारी जत्रोत्सव; सहाचाकी वाहनांना सकाळी नऊपर्यंतच प्रवेश

Sanguem News : २ या जत्रोत्सवासाठी देवस्थान समितीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वनमंत्री विश्‍वजीत राणे, मंत्री सुभाष फळदेसाई यांना खास निमंत्रित केले आहे.
Sanguem
SanguemDainik Gomantak

Sanguem News :

सांगे, गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या म्हायरे डिग्गी येथील प्रसिद्ध गौळादेवी देवस्थानचा जत्रोत्सव शनिवार २३ मार्च रोजी साजरा होणार आहे.

दरम्यान, या जत्रोत्सवास सहाचाकी वाहन घेऊन येणाऱ्या वाहनचालकांसाठी सकाळी नऊपर्यंतच प्रवेश असणार आहे. तसेच रात्री नऊनंतर ही वाहने माघारी सोडण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

या पत्रकार परिषदेस अध्यक्ष प्रदीप वेळीप, सचिव महादेव मिराशी, सल्लागार मनीष लांबोर, सदा डोईफोडे, सुरेश मिराशी, दिनेश मिराशी, संतोष वेळीप आदी उपस्थित होते.

मनीष लांबोर यांनी सांगितले की, म्हायरे डिग्गी येथील गौळादेवी देवस्थानकडे जाणारा नेत्रावळी अभयारण्यातील रस्ता अरुंद असल्यामुळे गेल्या वर्षी पंधरा तास वाहतूक खोळंबून राहिली होती. ही समस्या यंदा उद्‍भवू नये यासाठी सहाचाकी वाहनांसाठी सकाळी ९ पर्यंतच हा रस्ता खुला असणार आहे. तसेच आलेली वाहने रात्री ९ नंतरच परत सोडण्यात येणार आहेत. भाविकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, देवस्थान समितीने सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, वन तसेच पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून वाहतूक हाताळण्यास सहकार्य करण्याची मागणी केली आहे.

Sanguem
Goa Crime News: तरुणीची अश्‍लील छायाचित्रे प्रसारित केल्याने गुन्हा

मुख्यमंत्री, वनमंत्र्यांना निमंत्रण

१अध्यक्ष प्रदीप वेळीप यांनी सांगितले की, गोवा तसेच कर्नाटकातून हजारो भाविक खडतर प्रवास करून देवदर्शनासाठी येतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सहाचाकी वाहतुकीला वेळेचे बंधन घातले आहे.

२ या जत्रोत्सवासाठी देवस्थान समितीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वनमंत्री विश्‍वजीत राणे, मंत्री सुभाष फळदेसाई यांना खास निमंत्रित केले आहे.

३महाप्रसाद करण्यासाठी ज्या भाविकांना साहित्य दान करायचे असेल त्यांनी २२ मार्च दुपारी बारापर्यंत पणसामळ, उगे येथील माया जांगळी किंवा कुळे येथील जानो दमेकर यांच्याकडे संपर्क साधावा.

४जत्रोत्सवाच्या दिवसी दुपारी १२ वाजता देवीला चिरा (साडी ) नेसविण्याचा कार्यक्रम सुरु होणार आहे. तीर्थप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी पाचपर्यंत महाप्रसाद वितरण होणार आहे. त्यानंतर भजन व रात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com