Salcete Railway : रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांतील अनिश्र्चितता

गाड्या रद्द करण्यात आल्या
Railway
RailwayDainik Gomantak

Salcete : कॅसलरॉक व करंझोळ दरम्यान रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांतील अनिश्र्चितता अजूनही जाणवत आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांचे मार्ग बदलले, असे दक्षिण पश्र्चिम रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले.

पूर्ण रद्द झालेल्या गाड्या

रेल्वे क्र. 17315 वास्को ते वालंकिणी, वास्कोहून 31 जुलैला सुटणारी, रेल्वे क्र. 17316 वालंकिणी ते वास्को, वालंकिणीहून १ ऑगस्ट रोजी सुटणारी. वास्कोहून सुटणाऱ्या यशवंतपूर एक्स्प्रेसच्या 31 जुलै व 1 ऑगस्टच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यशवंतपूर ते वास्को रेल्वे क्र. 17309 क्रमांकाच्या 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी सुटणाऱ्या गाड्या रद्द केल्या.

Railway
Salcete News : ‘नगरनियोजन’मधील ‘2011 आरपी’ची फाईल गेली कुठे?

अंशत: रद्द केलेल्या गाड्या

रेल्वे क्र. 12780 हजरत निझामुद्दीन ते वास्को (दररोज) 29 जुलै रोजी हजरत निझामुद्दीनहून सुटणारी बेळगावीपर्यंत येईल. बेळगाव ते वास्को प्रवास रद्द., रेल्वे क्र. 12779- वास्को ते हजरत निझामुद्दीन, वास्कोहून 31 जुलै 1 ऑगस्ट रोजी सुटणार नाही.

मार्ग बदललेली गाडी

एर्नाकुमल ते पुणे ही 11098 क्रमांकाची गाडी जी 31 जुलै रोजी एर्नाकुलमहून सुटेल तिचा मार्ग बदलण्यात आला आहे. ही गाडी मडगावनंतर माजोर्डा, रोहा, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणेहून जाईल. त्यामुळे ही गाडी सावर्डे, कुळे, लोंडा, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सांगली, कराड व सातारा मार्गावरून जाणार नाही. या बदलाची प्रवाशांनी दखल घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com