Vasco News : सडा येथील ‘रोज सर्कल’ मैदान रात्रीच्यावेळी मद्यपींचा अड्डा; कारवाई करण्याची मागणी

Vasco News : हे प्रकरण गंभीर असून क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय व पोलिसांनी कारवाईसाठी योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे.
Vasco
VascoDainik Gomantak

Vasco News :

वास्को, मुरगाव सडा येथील क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाचा रोज सर्कल मैदान मद्यपींचा अड्डा बनला आहे. रोज सर्कल मैदानावर रात्री मद्यपी दारू पिऊन बाटल्या मैदानावरच फोडून टाकत असल्याचे दिसून आले आहे.

हे प्रकरण गंभीर असून क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय व पोलिसांनी कारवाईसाठी योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे.

मुरगाव सडा येथील पुर्वीचा रोज सर्कल मैदान सरकार तर्फे सर्व साधन सुविधा उपलब्ध करून उभारण्यात आला होता.या मैदानाचे नूतनीकरण क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे करण्यात आले होते. या मैदानाजवळ तीन विद्यालये असून या मैदानांचा उपयोग येथील विद्यार्थी करत आहेत. सद्या विद्यालयांना सुट्टी असल्याने येथे शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ नसते.

या मैदानावर सकाळ, संध्याकाळ व रात्रीच्या वेळी युवक, ज्येष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून रात्री उशिरा काही मद्यपी मैदानावर येऊन धिंगाणा घालत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

सडा येथील ‘रोज सर्कल’ मैदानालगत व मैदानात दारूच्या बाटल्या व ग्लास मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. रात्रीच्या वेळी काही युवक या मैदानावर येऊन दारू पिऊन दारूच्या बाटल्या व ग्लास फोडत असतात.

Vasco
Goa Human Trafficking: गोव्यात कशी होते मानवी तस्करी, कोणती आमिष दिली जातात? डिजीपींनी दिली माहिती

व्यायामशाळा उभारण्याची मागणी

पूर्वी रोज सर्कल मैदानावर क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाची व्यायाम शाळा होती.या मैदानाचे नूतनीकरण करताना येथे हिरवळ असलेले सुसज्ज मैदान व इनडोअर बॅडमिंटन कोर्ट बनवला.

परंतु संचालनालयाने या मैदानावर पूर्ववत व्यायाम शाळा न उभारल्याने युवकांनी पुन्हा येथे व्यायाम शाळा उभारण्याची मागणी केली आहे.राज्य सरकारने या मैदानावर व्यायाम शाळा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील युवकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com