रोटरी क्लबतर्फे महापालिका कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य वाटप

CCP-Goa-Panaji
CCP-Goa-Panaji

पणजी:पणजी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कचरा गोळा करणाऱ्या १०० कर्मचाऱ्यांना येथील रोटरी क्लब ऑफ पणजीच्यावतीने सुरक्षेचा उपाय म्हणून जॅकेट्स व ग्लोव्हजेचे वितरण नुकतेच करण्यात आले.याप्रसंगी महापौर उदय मडकईकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश कुलकर्णी, क्लबचे सचिव साईराज धोंड, नगरसेवक व इतर क्लबचे सदस्य उपस्थित होते.
या जॅकेट्समुळे कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे स्वच्छच राहतील आणि कचरा उचलताना स्वच्छतेचा एक भाग म्हणून ग्लोव्हजचा वापर करता येईल.त्यामुळे त्यांचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. पिवळ्या रंगाच्या या जॅकेट्सवर रोटरी ऑर्गनायझेशनचे लोगो दृष्टीस पडणार आहे. यामुळे निश्चितपणे रोटरीची समाजात प्रतिमा उंचावेल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
यापूर्वी रोटरी क्लबच्यावतीने मासळी मार्केटमधील मासे कापणाऱ्यांना ॲप्रनचे वितरण करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.रोटरी क्लबच्या या कार्याचे महापौर मडकईकर यांनी कौतुक केले.समाजाप्रती क्लब आपली बांधिलको जोपासत असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com