कोरोनाचा धोका वाढला

kamarabhat
kamarabhat

पणजी :

दिवसेंदिवस राज्‍यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. ताळगाव येथील रहिवासी असलेल्‍या ६४ वर्षीय व्‍यक्तीचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. गेल्‍या चोवीस तासांत ७२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्‍ह आला आहे, तर ७४ जण कोरोनामुक्‍त झाले आहेत. यामुळे राज्‍यात सध्‍या एकूण ७१३ कोरोना पॉझिटिव्‍ह आहेत. कोरोनाची लागण आता गावागावांत पोहोचली आहे. मात्र, सरकार हा सामुदायिक प्रसार नसल्‍याचे सांगत आहे. त्‍यामुळे जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार मांगोरहिल परिसरात २५३, मांगोरहिलसंबंधित १९४ रुग्ण आहेत.

बुधवारी १३३१ जणांच्‍या चाचण्‍यांसाठी नमुने गोळा केले होते, तर १५०५ जणांचे अहवाल आरोग्‍य खात्‍याच्‍या हाती आले. ४२१ देशी प्रवाशांना आणि ३३ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्‍वारंटाईन केले आहे. इस्‍पितळातील आयसोलेशनमध्‍ये आज १६ जणांना ठेवण्‍यात आल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली. रुग्‍णांमध्‍ये रस्‍ता, विमान आणि रेल्‍वेमार्गे आलेल्‍या ११६ रुग्‍णांचा समावेश आहे. तर ४९७ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. तसेच पर्वरी येथे २ रुग्ण, मडगाव येथे ८ रुग्ण, केपे येथे ७, लोटली ११, नावेली २, म्हापसा ६ , काणकोण ६, वेर्णा येथे ४ अशा रुग्णांची संख्या आहे.

कामराभाट - पणजीत एकजण पॉझिटिव्‍ह
कामराभाट - करंजळे परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. येथेही आता लोकांच्या पडताळणी चाचण्या करण्यात येणार असल्याचे समजले.

दक्षिण गोव्यातील ज्या आमदाराला कोरोना झाला, त्‍याची तब्येत स्थिर आहे. राज्यातील डॉक्टर दिवस - रात्र कोरोनाविरोधात लढत आहेत. त्‍यांच्‍या त्यागाची आपण जाणीव ठेवायला हवी. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे आम्‍ही पालन करीत आहोत. ही वेळ कोणत्याही प्रकारचे राजकारण करण्याची नाही, तर सर्वांनी एकत्र येत लढा देण्याची आहे.
- विश्‍‍वजित राणे, आरोग्‍यमंत्री

‘त्या’ व्यक्तीवर आज अंत्यसंस्कार
ताळगाव येथील व्‍यक्तीचा कोरोनाच्‍या संसर्गामुळे मृत्यू झाला, त्या व्यक्तीवर आज सांतिनेज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी त्यांच्या घरातील लोकही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, डॉ मधू घोडकिरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा मृतदेह प्रसार करू शकत नाही. त्‍यामुळे लोकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com