Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding First Visuals: शुभमंगल सावधान! रकुल-जॅकी अडकले लग्न बंधनात, पाहा फोटो

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding: रकुल आणि जॅकीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding First Visuals
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding First VisualsDainik Gomantak

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding First Visuals

बॉलीवूड अभिनेता रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता व चित्रपट निर्माता जॅकी भगनानी दोघेही लग्न बंधनात अडकले आहेत. गोव्यातील अलिशान हॉटेलमध्ये दोघांनी पंजाबी आणि सिंधी या दोन्ही पद्धतीने विवाह केला.

रकुल आणि जॅकीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

रकुल आणि जॅकी दोन रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याची माहिती समोर आली होती. रकुल - जॅकी 'आनंद कारज' (पंजाबी रितीरिवाज) रितीरिवाजानुसार लग्न केले आहे.

रकुल - जॅकी लग्नात सहभागी झालेल्या सिने कलाकारांचा फोटो देखील समोर आला आहे. यात अभिनेता आयुष्यमान खुराणा त्याची पत्नी ताहीरा कश्यप खुराणा, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा, भूमी पेडणेकर आणि समिक्षा पेडणेकर यांचा एकत्र फोटो समोर आला आहे.

या शाही लग्नात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स गोव्यात दाखल झाले आहेत. वधू रकुलचा चुडा समारंभ बुधवारी (दि.21) सकाळी पार पडल्यानंतर, दुपारी 3.30 नंतर दोघांनी लग्न केले.

रकुल आणि जॅकीचा लग्न समारंभ पूर्णपणे खाजगी ठेवण्यात आल्याने लग्नातील दोघांचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com