क्वारंटाईन केंद्राचे बिल ४८००० रुपये!

Corona
Corona

म्हापसा

आता एवढी मोठी रक्कम फेडायची कशी अशी स्थिती त्याची झाली होती. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय बर्डे यांनी मध्यस्थी केल्याने त्या क्वारंटाईन व्यक्तीची केंद्रातून सुटका करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निश्चित करण्यात आल्याची माहिती खुद्द बर्डे यांनी दिली.
उपलब्ध माहितीनुसार, गंगानगर-खोर्ली येथील मोहम्मद रफीक या तरुणास त्याचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे कारण देत म्हापसा पोलिसांकडून म्हापशातील क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले होते. या केंद्राच्या देखरेखीखाली असलेल्या मोहम्मद याचा अंतिम अहवाल नकारात्मक निघाल्याने मोहम्मद याने आपली क्वारंटाईन केंद्रातून सुटका करण्याची विनंती केली असता, त्याला ४८ हजार रुपयांचे बिल चुकते करण्याचे फर्मावण्यात आले.
केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून फर्मावण्यात आलेल्या या आदेशानंतर पूर्णपणे हतबल झालेल्या मोहम्मद रफीक याने बार्देशातील मातब्बर राजकारण्यांची भेट घेत आपली कैफीयत मांडली, परंतु हे प्रकरण मिटण्याऐवजी वाढतच गेल्याने शेवटचा उपाय म्हणून मोहम्मद रफीक याच्या नातेवाईकांनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस संजय बर्डे यांची भेट घेत आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली. संजय बर्डे यांनी याबाबतीत सखोल चौकशी करण्याबरोबरच उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात यासंबंधात रितसर अर्ज सादर करीत मोहम्मद रफीक यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्यानुसार म्हापसा मामलेदार कार्यालयाकडून रफीक यांना क्वारंटाईन केंद्रातून तात्काळ मुक्त करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती संजय बर्डे यांनी दिली.

संपादन - यशवंत पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com