Bicholim News : ‘वेदांता’ने पुन्हा खनिज उत्खनन केल्यास आंदोलन; बोर्डे कोमुनिदाद

Bicholim News : प्रसंगी खाणीवर धडक देऊ, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‍भवल्यास त्याला कंपनी जबाबदार राहील, असेही कोमुनिदाद मंडळाने स्पष्ट केले आहे.
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, ‘वेदांता’ (सेसा) खाण कंपनीने आमच्या मालमत्तेत पुन्हा अतिक्रमण करून खनिज चोरण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा बोर्डे कोमुनिदादने दिला आहे.

प्रसंगी खाणीवर धडक देऊ, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‍भवल्यास त्याला कंपनी जबाबदार राहील, असेही कोमुनिदाद मंडळाने स्पष्ट केले आहे.

‘वेदांता’ने कोमुनिदादच्या जागेत (सर्व्हे नं.४२/०) अतिक्रमण करून खनिज उत्खनन केले आहे. ६३ ग्रेड दर्जाचा खनिज मालही परस्पर चोरला आहे, अशी तक्रार बोर्डे कोमुनिदादने डिचोली पोलिसांत केली आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज (गुरुवारी) बोर्डे कोमुनिदाद मंडळासह ‘वेदांता’च्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावून घेतले होते.

पोलिसांनी कोमुनिदाद मंडळ आणि ‘वेदांता’च्या अधिकाऱ्यांची जबानीही घेतली. पोलिस चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना बोर्डे कोमुनिदादचे अध्यक्ष धनंजय पळ यांनी वरील इशारा दिला. यावेळी कोमुनिदादचे अन्य पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते. याप्रकरणी खाण खात्याकडे तक्रार करण्यात येणार आहे, असेही पळ म्हणाले.

पोलिस चौकशी :

बोर्डे कोमुनिदादच्या तक्रारीच्या अनुषंगाने आज सकाळी डिचोली पोलिसांनी कोमुनिदाद मंडळ आणि वेदांताच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. ज्या जागेत बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन करण्यात येत असल्याचा कोमुनिदादने दावा केला आहे. त्या मालमत्तेचा लीज करार असल्याचा दावा कंपनीने केला. मात्र, चौकशीवेळी कागदपत्र सादर करण्यास कंपनी असमर्थ ठरली, अशी माहिती मिळाली आहे.

Bicholim
Coconut Feni GI Tag: माडाच्या फेणीबाबत सरकारने जबाबदारी घ्यावी; गोवा रैंदेर संघटनेने केलीय 'ही' मागणी

कोमुनिदादच्या मालमत्तेत यापूर्वी खनिज उत्खननाचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो रोखून गेल्या २९ एप्रिल रोजी कंपनीला कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. खाण व्यवसायास कोमुनिदादचा विरोध नाही. कोमुनिदादने कंपनीकडे ठेवलेल्या प्रस्तावावर अगोदर विचार करावा. मालमत्तेत अतिक्रमण केल्यास गावकरी रस्त्यावर उतरतील.

-धनंजय पळ, अध्यक्ष, बोर्डे कोमुनिदाद.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com