औद्योगिक वसाहतीतील कोरोनाचा फैलाव रोखा ः एल्वीस गोम्स

5
5

मडगाव

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीसह इतर औद्योगिक वसाहतीत कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून सरकारे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे (आप) राज्य निमंत्रक एल्वीस गोम्स यांनी केली आहे. उद्योगांच्या सामाजिक बांधीलकी निधीचा वापर करून औद्योगिक वसाहतीत कोविड निगा केंद्रे सुरू करावीत अशी मागणीही त्यांनी केली.
वेर्णा, जुवारीनगर, कुंकळ्ळी येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. सरकारच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याने कोरोना रुग्णांचे औद्योगिक वसाहत परिसरातच विलगीकरण करून तिथे त्यांची देखभाल करता येईल. औद्योगिक संघटना व औद्योगिक विकास महामंडळाने वैद्यकीय यंत्रणेच्या निरीक्षणाखाली कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी असे मत गोम्स यांनी व्यक्त केले.
उद्योगांचा सामाजिक बांधीलकी निधीचा वापर कऱण्याची हीच योग्य वेळ आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे मार्केट व ते भाड्याने राहात असलेल्या लोकवस्तीतील फिरणे स्थानिकांसाठी धोकादायक ठरू शकते असे गोम्स यांनी सांगितले.

sanjay ghugretkar

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com