Goa Shigmotsav 2023: पणजीतील शिगमोत्सव तयारीला प्रारंभ : नाईक

11 मार्चला शहरातून निघणार मिरवणूक
Goa Shigmotsav 2023
Goa Shigmotsav 2023Dainik Gomantak

Shigmo Festival in Goa 2023: राज्यात मोठ्या प्रमाणात शिगमोत्‍सव साजरा केला जातो. ‘ओस्सय...ओस्सय’ आणि ‘घुमचे कटर घुम’चा निनाद राज्यात 8 मार्चपासून घुमणार आहे.

राजधानी पणजीतून शनिवार, 11 मार्चला शिगमोत्सव मिरवणूक निघणार असून, त्यानिमित्त शहरातील समितीद्वारे विविध कार्यक्रमांची आखणी, नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती समितीचे कार्यकारी अध्‍यक्ष मंगलदास नाईक यांनी दिली.

गोव्याचे सांस्कृतिक संचित सर्वदूर पोहोचविण्यासाठी; वर्षभरातील आपला उत्साह द्विगुणित करण्यासाठी शिगमोत्सवातील चित्ररथ, लोककलाकार, ताशे, कासाळे तसेच

इतर पारंपरिक वाद्ये सज्ज होत असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात शासकीय शिगमोत्सवाला सुरुवात 8 मार्चपासून फोंड्यातून होत आहे.

Goa Shigmotsav 2023
Mauvin Godinho: 16 बसस्थानकांचे आधुनिकीकरण

पणजी शहरातील शिगमोत्सव आयोजन समितीद्वारे तयारीला सुरुवात करण्यात आली असून, शिमगोत्सवादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आखणीला वेग आला आहे.

- मंगलदास नाईक, कार्यकारी अध्यक्ष, शिगमोत्सव समिती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com