Premier League Cricket: समर दुभाषीचे शानदार नाबाद 'द्विशतक'; साळगावकर क्लबचे जीनो क्लबवर वर्चस्व

Salgaonkar Club Vs Geno Club: झुंजार फलंदाजी करत असलेला कर्णधार दर्शन मिसाळ 60 धावांवर खेळत असून त्याच्यावर जीनो क्लबची सारी मदार आहे.
Samar Dubhashi
Samar DubhashiDainik Gomantak

Premier League Cricket: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी साळगावकर क्रिकेट क्लबला अनिर्णित लढतीत आघाडीचे तीन गुण पुरेसे आहेत. त्या दिशेने वाटचाल करताना त्यांनी प्रतिस्पर्धी जीनो स्पोर्टस क्लबवर वर्चस्व राखले. दरम्यान, पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर साळगावकर क्लबच्या पहिल्या डावातील 382 धावांचा पाठलाग करताना जीनो क्लबची शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर 8 बाद 251 अशी स्थिती होती. ते अजून 131 धावांनी मागे आहेत. झुंजार फलंदाजी करत असलेला कर्णधार दर्शन मिसाळ 60 धावांवर खेळत असून त्याच्यावर जीनो क्लबची सारी मदार आहे. साळगावकर क्लबचा फिरकी गोलंदाज सागर उदेशी याने 56 धावांत 4 गडी बाद केले.

मडगाव क्लबची जोमदार फलंदाजी

दरम्यान, सांगे येथील जीसीए मैदानावर नाबाद द्विशतकवीर समर दुभाषी (224 धावा, 347 चेंडू, 25 चौकार) याने शतकवीर यश कसवणकर (100 धावा, 248 चेंडू, 11 चौकार, 1 षटकार) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी 257 धावांची भागीदारी केली. त्यामुळे कालच्या 5 बाद 277 धावांवरुन मडगाव क्रिकेट क्लबने पहिल्या डावात 448 धावांचा डोंगर उभारला. उदित यादवनेही 40 धावांचे योगदान दिले. चौगुले क्लबच्या फरदीन खान याने 91 धावांत 6 गडी टिपले, तर कीथ पिंटो याने 3 विकेटसाठी 126 धावा मोजल्या. दुसऱ्या दिवसअखेर रोहन कदमच्या 48 व शंतनू नेवगीच्या नाबाद 44 धावांमुळे चौगुले क्लबने 2 बाद 123 धावा केल्या होत्या.

Samar Dubhashi
Premier League Cricket: जीनो क्लबविरुद्ध साळगावकर क्लबने उभारला धावांचा डोंगर!

धेंपो क्लबपाशी मोठी आघाडी

दुसरीकडे, कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर धेंपो क्लबने दिलेल्या 316 धावांच्या आव्हानासमोर पणजी जिमखान्याची दुसऱ्या डावात 2 बाद 18 अशी निराशाजनक सुरवात झाली. धेंपो क्लबने पहिल्या डावात 265 धावा केल्या. नंतर त्यांचा फिरकी गोलंदाज विकास सिंग (7-30) याने पणजी जिमखान्याचा पहिला डाव 166 धावांत गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला. पणजी जिमखान्याचा शिवेंद्र भुजबळ 44 धावांवर नाबाद राहिला, तर मनीष काकोडेने 30 धावा केल्या. अझान थोटा (81), विकास सिंग (48) व सोहम पानवलकर (34) यांच्या योगदानामुळे धेंपो क्लबने दुसरा डाव 9 बाद 233 धावांवर घोषित केला. पणजी जिमखान्याचे हेरंब एस. परब (5-85) आणि शुभम देसाई (3-60) हे गोलंदाज सफल ठरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com