Power Supply Facility : शिरोडा-पंचवाडीत भूमिगत वीजवाहिनी कामाला प्रारंभ ; वीज पुरवठा सुविधेत राज्यात क्रांती घडवणार

या योजनेमार्फत वीज सुविधेत राज्यात क्रांती घडवून आणली जाईल, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
Power Minister Sudin Dhavalikar
Power Minister Sudin DhavalikarDainik Gomantak

Power Supply Facility : शिरोडा, गोवा शासनाने सुमारे १८०० कोटी रू. ची तरतूद करून राज्यात अद्ययावत वीज सुविधा करण्याची योजना आखली आहे. यासाठी केंद्रसरकार मार्फत सुमारे ७८९ कोटी रू. ची मंजुरी मिळाली आहे.

या योजनेमार्फत वीज सुविधेत राज्यात क्रांती घडवून आणली जाईल, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी येथे भूमिगत वीजवाहिन्या आणि भूमिगत केबलिंग सिस्टममध्ये रुपांतरित करण्याचा शुभारंभ करताना मंत्री ढवळीकर बोलत होते.

या कामाची पायाभरणी पंचवाडी ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी रविवार२२ रोजी झाला. यावेळी जलस्त्रोतखात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर, शिरोडा जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत,

सावर्डेच्या जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा तेंडूलकर, पंचवाडीच्या सरपंच लीना फर्नांडिस, शिरोडा सरपंच पल्लवी शिरोडकर, सावर्डेच्या सरपंच चिन्मयी नाईक, वीजखात्याचे अभियंते राजीव

सामंत, कार्यकारी अभियंते सुभाष देसाई, पंचवाडी उपसरपंच पावलो गुदिन्हो, शिरोडा सरपंच सुनील नाईक आदी उपस्थित होते.

Power Minister Sudin Dhavalikar
Goa Casino News: प्रश्‍‍न अकरा हजार कोटींचा; कायदेतज्‍ज्ञ साळवे मैदानात

सरपंच लीना फर्नांडिस यांनी स्वागत केले. पंचायत सचिव ख्रिस्तेव डिकॉस्ता, शिरोडा भाजप मंडळ सरचिटणीस अवधूत नाईक यांनी व्‍यवस्थापनाची बाजू सांभाळली तर अभियंते सुभाष देसाई यांनी आभार मानले.

२४ तास वीज पुरवठ्याचा प्रयत्न !

ढवळीकर म्हणाले की, राज्यातील सर्व भागात २४ तास वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न आहे. आगामी काळात सुमारे ६०० कोटी रू. ची कामे खात्यातर्फे सुरू होणार आहे. जवळजवळ ९६० रू. कोटीची कामे विविध भागात सुरू आहेत.

जनतेने या कामाच्या कार्यवाहीत सहकार्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.मंत्री ढवळीकर यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या नामफलकाचे अनावरण करून या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.

भाजप शासन काळात शिरोडा मतदारसंघात भरपूर विकासकामे झालेली आहेत. वीजपाणी या मूलभूत गरजा असून त्या लोकापर्यंत सुरळीतपणे पोचवण्याचे काम चालू आहे.

वीजसमस्या दूर करण्यासाठी शासनातर्फे धाडसी पाऊल उचलले आहे.नागरिकांना विपूल प्रमाणात पाणी मिळवून देण्याचे काम हाती घेतले आहे.

जलस्त्रोत मंत्री -सुभाष शिरोडकर,

राज्य सरकारने सर्व भागात विकासकामाचा धडाका लावला असून प्रत्येक मंत्री आपले कार्य करण्यात मग्न आहेत. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी तर विजेच्या बाबतीत राज्यात क्रांतीच घडवून आणली आहे.

सर्व भागात भूमिगत वीजवाहिन्यांचे केबल चे जाळे विणले जात आहे. तर सुधारित वीज उपकरणे आणून बसवण्याचे कामही युध्द पातळीवर सुरू आहे.

-डॉ. गणेश गावकर,आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com