Parcem Land Issue : ग्रामसभेत पंचायत मंडळाला धारेवर धरत ग्रामस्थांनी केली 'ही' मागणी; म्हणाले किनारी...

ग्रामस्थ आक्रमक : ग्रामसभेत पंचायत मंडळाला धरले धारेवर
Parcem Land Issue
Parcem Land Issue Dainik Gomanatk

मोरजी,मांद्रे, हरमल या किनारी भागाप्रमाणे पार्से येथील जमिनी परप्रांतीयांना विकण्यास पार्से पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला.याविषयीं पंचायत मंडळाला धारेवर धरले. गावातील डोंगर माथ्यावरील जमिनी विक्रीच्या हालचाली सुरू असल्याचे यावेळी काही नागरिकांनी पंचायत मंडळाच्या लक्षात आणून दिले.

त्यावर पंचायतीने वेळीच उपाययोजना करावी, अन्यथा गावाचे अस्तित्व धोक्यात असल्याचे सांगून अशा जमीन विक्रीला आम्ही प्राणपणाने विरोध करू, असे सांगितले.

सरपंच अजय कळंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला उपसरपंच रेश्मा कांबळी, प्रज्ञा पार्सेकर, नवनिर्वाचित पंच अजित मोरजकर ,स्वप्नील नाईक, सुनिता बुगडे, मधुसूदन सातार्डेकर, पंचायत सचिव विजय तिळवे आदी उपस्थित होते.

सचिव विजय तिळवे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. सरपंच अजय कलंगुटकर यांनी विविध सरकारी योजनांची माहिती दिली.

Parcem Land Issue
Goa Assembly Monsoon Session: कला अकादमीनंतर क्रीडा स्पर्धेवरुन विरोधकांनी सरकारला घेरले

...तर कंत्राटदाराला ‘ना हरकत’ देऊ नये!

भूमिगत वीज वाहिनी घालण्यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत न केल्याने वाहन चालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागते.डांबरी असलेला पक्का रस्ता कच्चा झाला आहे.त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम खाते,वीज खाते यांच्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत बेजबाबदार कंत्राटदारावर कडक कारवाई करावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

यापुढे पाणी पुरवठा खात्याकडून जलवाहिन्या टाकण्यासाठी पुन्हा रस्ता खोदण्यात येणार असल्याने त्यांना पंचायतीने ‘ना हरकत दाखला’ देऊ नये, अशी सूचनाही करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com