Panaji News : मळा-पणजीतील शाळेलाही बजावली नोटीस; अतिरिक्‍त शुल्‍क आकारणी प्रकरण

Panaji News : कारवाईचे पालकवर्गाकडून स्‍वागत ;संबंधित शाळेने विहित वेळेत त्‍याला उत्तर दिलेले नाही, अशीही माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, राज्य सरकारकडून गलेलठ्ठ अनुदान मिळत असतानाही विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील विविध उपक्रमांच्या नावाखाली अनुदानित शाळांकडून शुल्क आकारण्यात येते. याच अनुषंगाने ‘मुष्टिफंड’प्रमाणेच मळा-पणजी येथील एका शाळेला शिक्षण खात्‍याने नोटीस बजावली आहे.

संबंधित शाळेने विहित वेळेत त्‍याला उत्तर दिलेले नाही, अशीही माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.

एका तक्रारीनंतर शिक्षण संचालनालयाने ‘मुष्टिफंड’ संस्थेला नोटीस बजावून बेकायदेशीरपणे शुल्क आकारणे, वसुली करणे किंवा घेणे आणि पूर्वमंजुरीशिवाय असा निधी संकलित केल्याच्‍या दाव्‍यावर खुलासा मागितला आहे. यासंदर्भात सर्वत्र वृत्त पसरताच पालकवर्गातून समाधान व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. अन्‍य काही शाळा रडारवर असून, मळा-पणजी येथील एका प्रसिद्ध शाळेला बेकायदा शुल्‍क आकारल्‍याबद्दल नोटीस बजावण्‍यात आल्‍याचे कळते.

Panaji
Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

नववीच्‍या पुस्‍तकांचा उद्या फैसला

इयत्ता नववीपासून नवे शैक्षणिक धोरण लागू करण्‍यात येणार आहे. त्‍यात ‘इंटर डिसिप्‍लिनरी’ हा विषय नव्‍याने समाविष्‍ट करण्‍यात आला आहे. त्‍यासाठी पुस्‍तके कशी असतील, त्‍याचे स्‍वरूप काय असेल, यावर अद्याप खुलासा झालेला नाही. त्‍या अनुषंगाने मंगळवारी वरिष्‍ठ पातळीवर बैठक होणार असून, त्‍यावेळी अनेक मुद्दे चर्चेला येतील. तसेच क्रमिक पुस्‍तकांविषयी माहिती जाहीर करण्‍यात येईल, असेही संबंधित सूत्रांनी सांगितले.

पुस्‍तकांना विलंब नको!

नवे शालेय वर्ष जून महिन्‍यात सुरू होईल. मुलांना रेनकोटचे पैसे पालकांच्‍या खात्‍यात जमा करण्‍यात येतात. ही प्रक्रिया वेळेत व्‍हावी, अशी मागणी होत आहे. तर क्रमिक अभ्‍यासक्रमाच्‍या पुस्‍तकांना यंदा विलंब होणार नाही, असे जाहीर करण्‍यात आले असले तरी त्‍याची तंतोतंत अंमलबजावणी व्‍हावी, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com