Bhajan Competition 2023 : बाल कलाकारांची भजनी स्पर्धा 9 ऑगस्टपासून

31 पथकांचा सहभाग : 3 केंद्रामधून आयोजन
Bhajan Competition 2023
Bhajan Competition 2023Dainik Gomantak

Panaji : कला अकादमी गोवा आयोजित पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती विभागीय स्तरावरील बाल कलाकारांची भजनी स्पर्धा 9 ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. यंदा बाल विभागात एकूण 31 पथके सहभागी झाली असून एकूण ३ केंद्रातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार,9 ऑगस्ट रोजी खर्रे, वाडे, सुकुर - बार्देश येथील श्री वेताळ देवस्थान सभागृह, येथे होणाऱ्या केंद्र क्र. १ मध्ये संगीत शारदा विद्यालय मंदिर, धाकटे भाट, डोंगरी-तिसवाडी, स्वर साधना सांस्कृतिक कला संस्था, माडेल, चोडण तिसवाडी, श्री राम सेवा संघ बाल भ. मं., गट अ, मयडे - बार्देश, श्री राम सेवा संघ बाल भ. मं., गट ब, मयडे , श्री साई दिगंबर बाल भ. मं., आसगांव, श्री शांतादुर्गा जांभळेश्वर संगीत संस्था, कळंगुट, बालभवन केंद्र, म्हापसा, स्वर गंधा बाल भ. मं., शिरेत, चिंबल, श्री शांतादुर्गा लक्ष्मी-नृसिंह साखळ्यो संस्थान, शंखवाळ व श्री राम विश्वकर्मा बाल भ. मं., वास्को ही पथके सहभाग होणार आहेत.

गुरुवार,10 ऑगस्ट रोजी साखळी येथील रविंद्र भवन, येथे होणाऱ्या केंद्र क्र. २ मध्ये स्वरदीप कल्चरल असोसिएशन आमोणा - डिचोली, बाल भवन केंद्र, वेळगे-सत्तरी, श्री शांतादुर्गा हायस्कूल बाल भ. मं., डिचोली, बाल भवन, श्री सिध्देश्वर नवदुर्गा बाल भ. मं., देऊळवाडा, सुर्ल, बालभवन केंद्र, नगरगाव, बाल भवन केंद्र, साखळी, न्यू एज्युकेशनल, कुडचडे, सर्वोदय हायस्कूल, कुडचडे व बाल भवन केंद्र, मडगाव ही पथके सहभागी होणार आहेत.शुक्रवार, ११ रोजी वेलिंग, सभागृह येथे होणा-या केंद्र क. ३ मध्ये श्री सातेरी प्रासादिक संगीत संस्था,म्हार्दोळ येथील श्री वेताळेश्वर देवस्थान श्री गोपाळकृष्ण सांस्कृतिक मं.आदी मंडळे सहभागी होणार आहेत.

Bhajan Competition 2023
Panaji Court News: 61 व्या वर्षी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; 87 व्या वर्षी झाली निर्दोष मुक्तता

स्पर्धेचा अनुक्रम चिठ्ठ्यांद्वारे ठरणार

स्पर्धेला दुपारी 2.30 वाजता सुरुवात होणार असून प्रत्येक पथकाने आपले सत्र सुरू होण्याआधी अर्धा तास सर्व कलाकारांसह स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. स्पर्धेचा अनुक्रम चिठ्ठया टाकून ठरविण्यात येईल व तो सर्वांवर बंधनकारक राहील. सादरीकरणाचा अनुक्रम न पाळणा-या पथकांना भजन सादर करु दिले जाणार नाही व सदर पथक स्पर्धेतून बाद ठरविण्यात येईल, असे कला अकादमीने कळवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com