Education News : आता विद्यालयातच मिळणार करिअर मार्गदर्शन!

Education News : यापुढे अन्य स्तरावरही शिक्षण कसे देता येईल याविषयीच्या चित्रफिती शिक्षण खाते तयार करेल. या शिक्षणातून पंचज्ञानेंद्रिय वृद्धी कशी करावी याचे शिक्षण दिले जात आहे.
Education
EducationDainik Gomantak

Education News :

पणजी, येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विद्यालयातच करिअर मार्गदर्शन केले जाणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या नामांकित संस्थेचे तज्ज्ञ शाळांमधून हे मार्गदर्शन करणार आहेत.

राज्य सरकारकडून कोणतेही शुल्क न घेता टाटा कंपनी ही सेवा देणार आहे. तशा सामंजस्य करारावर आज मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कडून बाला सुब्रमण्यम चंद्रमौळी आणि हर्ष नागपाल हे अधिकारी उपस्थित होते.

Education
CVoter Survey Goa: भाजप का काँग्रेस, गोव्यात लोकसभेला कोण जिंकणार? सी-व्होटर सर्व्हे काय सांगतो?

एवढे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, विद्यार्थिदशेतच पुढे कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याची माहिती मिळाली तर आवडीचे करिअर निवडणे सोपे होणार आहे. एखादी विशिष्ट सेवा शाखा निवडायची असेल तर त्याचे शिक्षण नेमके कुठे मिळते, याची माहिती ही विद्यार्थ्यांना आता शाळेतच दिली जाणार आहे.

कसे शिकवावे; २७ चित्रफितींतून शिक्षकांना शिकवण

नवे शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर आता पूर्व प्राथमिक स्तरावर शिक्षकांनी कसे शिकवावे याचे मार्गदर्शन करणाऱ्या २७ चित्रफिती शिक्षण खात्याने तयार करून घेतल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयातील एका कार्यक्रमात या चित्रफीतींचे अनावरण केले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की नव्या शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक स्तरावर शिक्षकांनी कसे शिकवले पाहिजे, याचे मार्गदर्शन राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शिक्षकांना या चित्रफितींच्या माध्यमातून करता येणार आहे.

शिक्षण खात्याने हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. यापुढे अन्य स्तरावरही शिक्षण कसे देता येईल याविषयीच्या चित्रफिती शिक्षण खाते तयार करेल. या शिक्षणातून पंचज्ञानेंद्रिय वृद्धी कशी करावी याचे शिक्षण दिले जात आहे.

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना या माध्यमातून कशी देता येईल, याचे सुटसुटीत मार्गदर्शन या चित्रफितीतून होत आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी यावेळी सांगितले, की नऊ शाळातील शिक्षकांनी या चित्रफिती तयार केल्या आहेत. शंभर चित्रफिती तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com