Smart City : स्मार्ट बसथांब्याच्या शेडचे ‘डिझाईन’ फायनल होणार ? नागरिकांचा सवाल

Smart City : मार्केट येथील बसस्थानकाचा चौथरा तयार करण्यात येत असून, सध्या त्याचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.
Smart City
Smart City Dainik Gomantak

Smart City :

पणजी शहरासह तिसवाडी तालुक्यात इलेक्ट्रिक बससेवा सुरू होणार आहे. त्यासाठी पणजी शहरात स्मार्ट बसथांब्याच्या शेडची उभारणी होत आहे.

यापूर्वी दोन डिझाईन पसंत न पडल्याने पुन्हा ते करण्यात आले आहे आणि तेच कायम होणार असे वाटतेय. कारण सध्या मार्केट परिसरात उभारलेल्या या स्मार्ट बसथांब्याच्या शेडचे काम गतीने सुरू आहे.

पणजी शहर स्मार्ट सिटी होत असल्याने शहर व परिसरात इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येणार होती. परंतु त्यासाठी आवश्‍यक असणारे रस्ते आणि बसथांब्याच्या शेडची निर्मिती झालेली नाही. सुमारे १६० बसथांब्याचे शेड उभारले जाणार आहेत. त्यासाठी दोन ते तीनवेळा मॉडेल करून उभारून पाहण्यात आले.

Smart City
Goa Congress: दु:खी नाही पण नाराज! उमेदवारी न मिळाल्याने फ्रान्सिस सार्दिन बंडखोरीच्या तयारीत?

ते पसंतीस न पडल्याने काही दिवसांपूर्वी त्याची पुन्हा निर्मिती करण्यात आली. त्यावर पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आक्षेप घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे, अशी त्यांनी मागणी केली होती. परंतु पूर्वी उभारलेली शेडच सध्या कायम राहिली असून, त्यातच काही बदल करून कायम करण्यात येत असावेत, असे दिसते.

मार्केट येथील बसस्थानकाचा चौथरा तयार करण्यात येत असून, सध्या त्याचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर तीच शेड कायम राहणार काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com