सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करत महिला पोलिस अधिकार्‍याचा अपमान; एकास अटक

संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी वरील कारवाई केली.
Insulting Female Police Officer
Insulting Female Police OfficerDainik Gomantak

One Arrested by Colvale Police For Insulting a female police officer

महिला पोलिस अधिकार्‍याचा अपमान करुन तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी थिवीमधील एकाला अटक केली. संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी वरील कारवाई केली.

Insulting Female Police Officer
CM Pramod Sawant: ‘बाणस्तारी अपघाताच्या तपासात हस्तक्षेप नाही’, निष्पक्ष तपासासाठी मी आग्रही

पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या माहितीनुसार, संशयित लिंडन सिक्वेरा (शिरसई) याने एक व्हिडिओ रिकॉर्ड केला होता. ज्यामध्ये तो महिला पोलिस अधिकार्‍याचा अपमान व शिवीगाळ करताना दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. त्यानुसार, तक्रारीच्या आधारे कोलवाळ पोलिसांनी भादंसंच्या कलम ३५४(अ), ५००, ५०४ व ५०९ अन्वये गुन्हा नोंदविला होता.

त्यानंतर, संशयिताने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, कोलवाळ पोलिसांनी या जामीन अर्जाला विरोध केला व त्यानुसार न्यायालयाने संशयिताचा हा अर्ज फेटाळला असता पोलिसांनी संशयितास अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com