Goa Police At Bar: आता बार बाहेर तैनात करणार साध्या वेषातील पोलिस; ट्रॅफिक विभागाचा निर्णय

ड्रंक अँड ड्राईव्हवर नियंत्रणासाठी उपाययोजना
Goa Police will Depoly at Bar to curb drunk and drive
Goa Police will Depoly at Bar to curb drunk and drive Dainik Gomantak

Goa Police At Bar: गोव्यातील ड्रँक अँड ड्राईव्हच्या घटनांवर नियंत्रणासाठी आता राज्यातील काही बार च्या बाहेर साध्या वेषातील पोलिस तैनात करण्यात येणार आहे. दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक पोलिस विभागाचे उपाधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी ही माहिती दिली आहे.

गर्दी होणाऱ्या बारच्या बाहेर संध्याकाळी, रात्री हे साध्या वेषातील पोलिस तैनात केले जातील. दारू पिऊन गाडी चालवण्याला प्रतिबंध करण्याच्या हेतून हा उपाय केला जाणार आहे. यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू पाहणाऱ्यांना बारबाहेरच आळा बसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com