आता गोशाळांना घ्‍यावी लागेल पर्यावरणाची काळजी

goshala
goshala

अवित बगळे

पणजी :

गोशाळा आणि डेअरी प्रकल्प केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण व्यवस्थापनाखाली आणले आहेत. त्याविषयीची मार्गदर्शक तत्त्‍वे मंडळाने जारी केली असून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळावर या मार्गदर्शक तत्त्‍वांचे पालन केले जाते की नाही, हे पाहण्याची याची जबाबदारी देण्यात आली आहे.
गोशाळा जनावरांच्या संख्येनुसार विविध वर्गात विभागल्या आहेत. २५ पर्यंत जनावरे असलेल्यांचा एक वर्ग, २६ ते ५० जनावरे असलेल्या दुसऱ्या वर्गात, ५१ ते ७५ जनावरे असलेल्या तिसऱ्या, ७६ ते १०० जनावरे असलेल्या चौथ्या वर्गात, तर शंभरहून अधिक जनावरे असलेल्यांचा पाचवा वर्ग केला आहे. मंडळाच्या म्हणण्यानुसार राज्यात ३० हजार गायी, तर १४ हजार म्हैशी आहेत. चारशे किलोचे जनावरे दिवसाला १५-२० किलो शेण, १५ ते २० लिटर मूत्र विसर्जित करते. हे साफ करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे वातावरण गोशाळेत दुर्गंधीमय असते, असे निरीक्षण मंडळाने नोंदवले आहे. शेण गटारात टाकण्यात आल्याने गटारे तुंबण्याचेही प्रकार घडतात. यातून डासांची पैदास बळावते, असे मंडळाचे म्हणणे आहे.


गोशाळांना हे करावे लागेल
गोशाळांनी नियमित अंतराने शेण गोळा करावे.
गोशाळा नियमितपणे निर्जुंतूक करावी
गोशाळेच्या फरशीवर लिंबाचे पाणी फवारावे
घन कचरा संकलीत करून योग्य व्यवस्था करावी
गटारात जाणाऱ्या पाण्यात शेण धुवू नये
गांडूळ खत निर्मितीला प्राधान्य द्यावे

- महेश तांडेल

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com