नावेली उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव! 6 पंच सदस्य एकवटले

सदस्यांना डावलून निर्णय घेतल्याचा आरोप
No confidence motion against dy sarpanch of navelim
No confidence motion against dy sarpanch of navelim Dainik Gomantak

No confidence motion against dy sarpanch of navelim damodar chavan

नावेली पंचायतीमध्ये सध्या सरपंचविरोधी वारे वाहत आहे. पंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या सहा पंच सदस्यांनी उपसरपंच दामोदर परशुराम चव्हाण यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव संमत केला आहे.

यामुळे सध्या नावेली पंचायतीमध्ये मत-मतांवर दिसून येत आहे. सहा पंच सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपसरपंच दामोदर चव्हाण हे पंचायतीसंदर्भातील कोणतेही निर्णय घेण्याआधी सदस्यांनी विश्वासात घेत नाहीत.

पंचायतीच्या कामकाजामध्ये सरपंच आणि उपसरपंचासोबतच पंच सदस्यांचा सहभागही तितकाच महत्वाचा असतो. मात्र उपसरपंच आपल्याला काहीच न सांगता प्रत्येकवेळी निर्णय घेत असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले केले.

याबाबत दामोदर चव्हाण यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करत सहाही सदस्यांनी सह्या केल्या आहेत. याबाबतीत पुढे नेमका काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com