गोवा जिल्हा पंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज

Newly elected members of Goa District Panchayat going to swear in in today
Newly elected members of Goa District Panchayat going to swear in in today

पणजी  :  जिल्हा पंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज सकाळी ११ वाजता पर्वरी येथील सचिवालयातील सभागृहात होणार आहे. त्यासंबंधीचे पत्र प्रशासक व पंचायत संचालक नारायण गाड यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पाठविले आहे. शपथविधी झाल्यानंतर उत्तर व दक्षिण गोवा अध्यक्ष - उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यासाठी तारीख निश्‍चित करण्यासाठीचा प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. नाताळ सण असल्याने ही निवडणूक नववर्षातच होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस या पदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांना वाट पाहावी लागणार आहे.

जपने उत्तर व दक्षिण जिल्ह्यात ३३ जागा जिंकून बहुमत मिळवून काँग्रेससह इतर सर्व विरोधकांना धूळ चारली. त्यांच्याकडे बहुमत असूनही अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजपचे डिचोलीत ४ पैकी ३, तिसवाडीत ५ पैकी ४, फोंड्यात ७ पैकी ४, काणकोणात २ पैकी २, वाळपईत बाजी मारल्याने नवनिर्वाचित सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उत्सुक बनले आहे. काही सदस्याने मंत्री तसेच आमदारांमार्फत आपापले घोडे दामटण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही जिल्ह्यात भाजपला बहुमत असल्याने अपक्षांची आवश्‍यकता नाही. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी जिल्हा पंचायत सदस्याची निवड करताना पक्षाने काही निकष तयार केले आहेत, त्याच्या आधारावर ही निवड केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी  सर्वाधिक व अनुभवी सदस्यांची निवड होऊ शकते असे संकेत दिले होते. त्यामुळे याचाच आधार घेऊन काहींनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून घेण्यासाठी भाजप कार्यकारी समितीच्या नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे.
 
वर्चस्‍वाच्‍या लढाईत अनेकजण ‘पास’

मगो व काँग्रेसमधून ज्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यांना त्यांची तालुक्यातील मतदारसंघावर असलेली पकड सिद्ध करण्याची जिल्हा पंचायत निवडणूक महत्त्वाची होती. या सर्व आमदारांनी या निवडणुकीत जोरदारपणे ताकद लावली होती. कारण, या निवडणुकीत भाजपचे विजयी होणारे उमेदवार त्यांचे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप तिकीट मिळवून देण्यास महत्त्‍वाचे होते. अनेकजण त्यामध्ये ‘पास’ झाले आहेत. विधानसभा निवडणूक एक वर्षावर पोहोचली आहे. त्यामुळे आतापासूनच भाजप आमदार व मंत्र्यांना जिल्हा पंचायत सदस्यांच्या मदतीने तयारी करावी लागणार आहे.


तिसवाडी, डिचोलीतून चढाओढ


उत्तर गोव्यातून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी तिसवाडी व डिचोली तालुक्यातून निवडून आलेल्या जिल्हा पंचायत सदस्यांत चढाओढ लागली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे साखळीचे असून त्यांचा हा मतदारसंघ डिचोली तालुक्यात येतो, तर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे तिसवाडी तालुक्यातील असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड या तालुक्यातील सदस्यांमधून होऊ शकते. दक्षिणेत अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव आहे.

उत्तरेत चुरस वाढली!

उत्तर गोव्यामध्ये सिद्धेश नाईक, धाकू मडकईकर, गोपाळ सुर्लकर व शंकर चोडणकर यांच्यात चुरस आहे. उत्तर गोव्यातून सिद्धेश नाईक हे खोर्लीमधून पहिल्यांदाच निवडून आले असून ते केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र असल्याने त्यांना झुकपे माप मिळू शकते. ते दुसऱ्यांदा सेंट लॉरेन्समधून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनीही दावा केला आहे. त्यामुळे तिसवाडी तालुक्याला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. डिचोलीमधून पाळीचे सदस्य गोपाळ सुर्लकर यांना उत्तर गोव्यातून सर्वाधिक मत्ते मिळाली आहेत.

उत्तरेत चुरस वाढली!

उत्तर गोव्यामध्ये सिद्धेश नाईक, धाकू मडकईकर, गोपाळ सुर्लकर व शंकर चोडणकर यांच्यात चुरस आहे. उत्तर गोव्यातून सिद्धेश नाईक हे खोर्लीमधून पहिल्यांदाच निवडून आले असून ते केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र असल्याने त्यांना झुकपे माप मिळू शकते. ते दुसऱ्यांदा सेंट लॉरेन्समधून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनीही दावा केला आहे. त्यामुळे तिसवाडी तालुक्याला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. डिचोलीमधून पाळीचे सदस्य गोपाळ सुर्लकर यांना उत्तर गोव्यातून सर्वाधिक मत्ते मिळाली आहेत.

 दक्षिणेतही महिलांचा दावा

दक्षिण गोव्यातही अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उत्तरेप्रमाणेच चुरस आहे. दक्षिणेतील अध्यक्षपद यावेळी महिलांसाठी राखीव आहे. त्याचा फायदा या जिल्ह्यातील महिला सदस्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. सांकवाळमधून बिनविरोध निवडून आलेल्या अनिता थोरात तसेच दोनवेळा जिल्हा पंचायतीवर निवडून आलेले सावर्डेतील सुवर्णा तेंडुलकर यांच्यात चुरस आहे, तर उपाध्यक्ष पदासाठी दोनवेळा निवडून आलेल्या उल्हास तुयेकर तसेच खुशाली वेळीप यांनी दावा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com